AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंच्या नगरसेवकांचं शिंदेंच्या नगरसेवकांना ओपन चॅलेंज, सत्तेतून बाहेर पडा आणि..पीडित कुटुंबासमोरच भिडले

मृत निलेश कोतकर यांच्या पत्नींचे मनपा आयुक्तांसोबत फोन वरून संभाषण झाले. महिलेने रडत मनपा आयुक्तांजवळ फोनवरून आपली व्यथा मांडली. त्यांनी शिक्षणानुसार नोकरी देण्याचे आश्वासन दिले.

ठाकरेंच्या नगरसेवकांचं शिंदेंच्या नगरसेवकांना ओपन चॅलेंज, सत्तेतून बाहेर पडा आणि..पीडित कुटुंबासमोरच भिडले
Nashik News
| Updated on: Jul 30, 2026 | 2:38 PM
Share

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या मुद्यावरुन राजकारण तापलं आहे. निलेश कोतकर या तरुणाचा रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे मृत्यू झाला. मृत निलेश कोतकर यांचे नातेवाईक आज सार्वजनिक बांधकाम विभागाबाहेर ठिय्या आंदोलनाला बसले होते. मृत निलेश कोतकर यांच्या पत्नीला पालिकेत नोकरी द्यावी, अशी त्यांच्या कुटुंबियांची मागणी आहे. दोन तासापासून सार्वजनिक बांधकाम अभियंत्याच्या दालनाबाहेर बसलेल्या मृत कुटुंबीयांची अखेर मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी भेट घेतली. खड्ड्यांमुळे बळी गेलेल्या मृत निलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांची अतिरिक्त आयुक्त सुवर्ण दखणे यांनी देखील भेट घेतली.

मृत निलेश कोतकर यांच्या पत्नींचे मनपा आयुक्तांसोबत फोन वरून संभाषण झाले. महिलेने रडत मनपा आयुक्तांजवळ फोनवरून आपली व्यथा मांडली. त्यांनी शिक्षणानुसार नोकरी देण्याचे आश्वासन दिले. शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्याकडून पीडित कोतकर कुटुंबाला 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आली, तर पक्षाकडून मदतीसाठी लवकरच निर्णय घेणार प्रवीण तिदमे यांची माहिती.

ठाकरेंच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या नगरसेवकांना डिवचलं

पीडित कुटुंबासमोरच दोन्ही शिवसेनेमध्ये जुंपली. शिंदेंच्या सेनेचे महानगरप्रमुख नगरसेवक प्रवीण तिदमे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे गट नेते केशव पोरजे एकमेकांना भिडले. सत्तेतून बाहेर पडून आमच्या सोबत लढा ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेत्याने शिंदेंच्या नगरसेवकांना आव्हान केले. सत्ताधारी असून तुम्ही आंदोलन करता, महापालिकेत तुम्हाला बोलू दिले जात नाही ठाकरेंच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या नगरसेवकांना डिवचलं.

विरोधकांसह सत्ताधारी पक्षांची भाजपकडे विनवणी

ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेपाठोपाठ आता नाशिक शहरातील खड्ड्यांच्या विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी ही रस्त्यावर उतरणार आहे. राष्ट्रवादीच्या मनपा गटनेत्यांकडून खड्ड्यांच्या प्रश्नावर विशेष महासभा घेण्यासाठी महापौरांना पत्र देण्यात आलं. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांकडून थेट रस्त्यावर उतरण्याचा महापालिकेला इशारा दिला. नाशिक शहरात पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था झाल्याने विरोधकांसह सत्ताधारी ही आक्रमक. शहरातील संपूर्ण रस्त्यांवर खड्डे पडल्याने खड्ड्यांच्या प्रश्नावर महासभा घेण्यासाठी विरोधकांसह सत्ताधारी पक्षांची भाजपकडे विनवणी.

Follow Us
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास