Video : आधी पुरामुळे नुकसान, आता गारपिटीचा फटका! बळीराजाच्या डोळ्यांदेखत कांद्याचं पीक भुईसपाट

शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि निफाड तालुक्यात तुफान पावसाने शेतीमालाचं प्रचंड नुकसान, पाहा व्हिडीओ

Video : आधी पुरामुळे नुकसान, आता गारपिटीचा फटका! बळीराजाच्या डोळ्यांदेखत कांद्याचं पीक भुईसपाट
गारपिटीचा मारा..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 10:17 AM

उमेश पारीक, TV9 मराठी, नाशिक : नाशिकच्या (Nashik Rain Update) चांदवड तालुक्यात तुफान पाऊस झाला. आसरखेडे, मातेवाडी, मंगरूळयासह अनेक गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळं शेतातील उभ्या पिकांचं (Nashik Rain Impact) मोठं नुकसान झालंय. तसेच कांद्याचं (Nashik Onion Crops) पीक अक्षरश: भूईसपाट झालंय.

30 सप्टेंबर रोजी रोजी संध्याकाळी चांदवड तालुक्यातील गावांत मुसळधार पाऊस झाला. तुफान गारपिटीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाला फटका बसलाय. मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत कांद्याचं हातातोंडाशी आलेल्या पिक हिरवलंय. आता या पिकांचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत सरकारने जाहीर करावी, अशी मागणी केली जातेय.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

30 सप्टेंबरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊन नुकसान झाल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. मुख्य पिक असलेला कांदा 100 टक्के नष्ट झाल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय. तर मका, बाजरी, सोयाबीनलाही फटका बस बसला असल्याचा शेतकऱ्यांनी म्हटलंय.

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा, असं शेतकऱ्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलं. दरम्यान, इकडे निफाड तालुक्यातील पालखेड आणि परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय.

सुमारे एक तास झालेल्या जोरदार पावसामुळे मका, सोयाबीन, टोमॅटो या पिकांना फटका बसलाय.निफाडमध्ये द्राक्ष हंगाम सुरू झाल्याने छाटण्याची कामेही सुरू झाली आहेत. छाटणी केलेल्या काही द्राक्ष उत्पादकांच्या बागेलाही मुसळधार पावसामुळे फटका बसलाय.

अचानक आलेल्या या आसमानी संकटाने टोमॅटो, मका, सोयाबीन यांसारख्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणत पाणी साचलं. ढगफुटी सदृश्य पावसाने पालखेड परिसरातील काही रस्त्यातील वाहतूकदेखील ठप्प झाली होती.

हवामान विभागाने वर्तवलेल्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वतर्वली होती. त्यानुसार बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, नाशिकसोबत पुण्यातही पावसाने हजेरी लावली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.