नाशिक स्मार्ट सिटीला नवा कारभारी, प्रकाश थविल यांची बदली, नगरसेवकांच्या मागणीला यश

| Updated on: Jul 02, 2021 | 4:18 PM

राज्याचे मुख्य सचिव आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिक स्मार्ट सिटी संदर्भात बैठक पार पडली.

नाशिक स्मार्ट सिटीला नवा कारभारी, प्रकाश थविल यांची बदली, नगरसेवकांच्या मागणीला यश
Nashik Municipal corporation
Follow us on

नाशिक: राज्याचे मुख्य सचिव आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिक स्मार्ट सिटी संदर्भात बैठक पार पडली. स्मार्ट सिटीच्या अपूर्ण कामांच्या विरोधात नगरसेवक आक्रमक झाले होते. तर, सीईओ प्रकाश थविल यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला. प्रकाश थविल यांची बदली ही प्रशासकीय बाब असल्याचं सीताराम कुटे यांनी सांगितलं. नाशिक स्मार्ट सिटीचा कारभार आता सुमंत मोरे पाहतील. (Nashik Smart City project CEO Prakash Thavil transfer now Sumant More will be new CEO decision taken in meeting today)

स्मार्ट सिटीचा कारभार सुमंत मोरे यांच्याकडं

नाशिक स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल आणि लोक प्रतिनिधी यांच्यामध्ये संघर्ष होत होता. त्यामुळे नाशिकच्या नगरसेवकांनी प्रकाश थविल यांची बदली करावी, अशी मागणी केली होती. राज्याचे सचिव सीतारम कुंटे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत प्रकाश थविल यांची बदली करण्यात आली आहे. आता सुमंत मोरे नाशिक स्मार्ट सिटीचे नवीन सीईओ असतील. थविल यांची बदली प्रशासकीय बाब असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी नगरसेवकांच्या रेट्या पुढे स्मार्ट सिटी प्रशासन झुकलं असल्याची चर्चा आहे.

कोरोनामुळे स्मार्ट सिटीला प्रकल्पाला मुदतवाढ

सीताराम कुंटे यांनी नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाला मुदतवाढ 2 वर्ष मिळणार असल्याची माहिती यावेळी दिली. कोविड मुळे हा कालावधी वाढवून देण्यात येत आहे. शहराच्या विकासासाठी पालिका प्रशासन, पदाधिकारी यासोबत समन्वय आवश्यक आहे, असं सीताराम कुंटे म्हणाले. ग्रीन फिल्ड प्रस्ताव नगरविकास विभागाकडे, मात्र हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. ABD प्रोजेक्ट मध्ये शहरात अतिरिक्त रस्ते निर्मिती केली जाते. कोरोना मुळं स्मार्ट सिटी कामातील गती कमी झाली. या प्रकल्पात आता विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी समन्वयक असतील.

प्रशासनानं गाफिल राहू नये

महाराष्ट्रात काही ठिकाणी आढळललेला डेल्टा प्लस हा साऊथ आफ्रिकन व्हेरिएंट आहे. काळजी वाटावी असा व्हेरिएंट असल्याची केंद्राची सूचना आहे. ऑक्सिजन पुरवठा हा आव्हानात्मक विषय आहे. कोरोनाच्या संकाटाच्या काळात गाफील न राहण्याच्या राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा आधार आहे. कोविड रुग्णांवर उपचारासाठी विराफीन,मोनोक्लोनल हे नवीन ड्रग उपचारासाठी इफेक्टिव्ह असल्याचं टास्क फोर्सच्या निदर्शनात आलंय, असं सीताराम कुंटे म्हणाले. लसीकरणामध्ये देशात महाराष्ट्र सर्वप्रथम असल्याची माहिती सीताराम कुंटे यांनी दिली आहे.

प्रशासनानं तिसऱ्या लाटेबाबत गाफील राहू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन,औषधे आणी बेड्ससाठी सतर्क राहण्याचे प्रशासकीय यंत्रणांना आदेश दिले आहेत. महापौरांची 100 कोटींची मागणी, मात्र कोविड निर्मूलन साठी निधीची आवश्यकता मोठी आहे. आवश्यकतेनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचं सीतारम कुंटे म्हणाले.

संबंधित बातम्या:

ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात, छगन भुजबळ यांचं वक्तव्य

तिसरी लाट तिशीच्या आतील तरुणांसाठी धोकादायक; टास्क फोर्सच्या हवाल्याने अजित पवारांचा इशारा

(Nashik Smart City project CEO Prakash Thavil transfer now Sumant More will be new CEO decision taken in meeting today)