Nashik Unlock : नाशिक जिल्ह्यात 7 जूनपासून काय सुरु? काय बंद? विकेंड लॉकडाऊन लागू राहणार

नाशिक जिल्हा अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात असल्यानं दुपारी 4 ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदी लागू राहणार आहे. Nashik Unlock

Nashik Unlock : नाशिक जिल्ह्यात 7 जूनपासून काय सुरु? काय बंद?  विकेंड लॉकडाऊन लागू राहणार
Nashik
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 12:34 PM

नाशिक: कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनं अनलॉकसाठी पाच टप्पे केले आहेत. नाशिक जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कार्यालये तसेच दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर, दुपारी चार ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. (Nashik Unlock from 7 June what services open or closed)

नाशिकमध्ये विकेंड लॉकडाऊन कायम

जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन कायम राहणार आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने, आस्थापना, दूध आणि भाजीविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. इतर दिवशी शासकीय आणि खाजगी कार्यालये, जिम, व्यायामशाळा, सलून 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. गर्दी टाळण्यासाठी मॉल्स, थिएटर्स आणि नाट्यगृहे दारं ही बंदच राहणार असली तरी मात्र चित्रीकरणास संध्याकाळी 5 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

लग्न समारंभासाठी 50 व्यक्तींची उपस्थिती

नाशिकमध्ये लग्न समारंभासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु असतील. त्यांनतर रात्री 8 पर्यंत पार्सल सेवा सुरु असेल. मैदाने, जॉगिंग ट्रॅक सुरु, बांधकाम आणि उद्योगक्षेत्रांना मोठा दिलासा मिळाला असून उद्योग आणि आयटी सेंटर नियमितपणे सुरु राहतील. तर बांधकांमांनाही दुपारी 4 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेतील बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही.

मालवाहतुकीस नियमितपणे परवानगी देण्यात आली असून 3 जण वाहनात बसू शकतील. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या बैठका, निवडणुका आणि आम सभा यांना कार्यक्रम स्थळाच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ठेवल्यास परवानगी असेल. कृषी विषयक दुकाने सायंकाळी 4 पर्यंत सुरु असतील. पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत मैदानी क्रीडा प्रकारात मोडणारे खेळ सुरु असतील.

संबंधित बातम्या:

घराला कुलूप पाहून चोरट्यांनी संधी साधली, तब्बल 65 तोळे सोने आणि 42 हजार रोख रकमेवर डल्ला

Nashik Unlock | नाशिकमध्ये आता सर्व दुकाने 4 वाजेपर्यंत सुरु राहणार, शनिवार-रविवार पूर्णपणे बंद, नवे नियम नेमके काय?

(Nashik Unlock from 7 June what services open or closed)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.