AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराला कुलूप पाहून चोरट्यांनी संधी साधली, तब्बल 65 तोळे सोने आणि 42 हजार रोख रकमेवर डल्ला

नाशिकच्या सातपूर परिसरात एक जबरी चोरीची घटना समोर आली आहे (Thieves entered the house in Nashik and stole jewellery and money).

घराला कुलूप पाहून चोरट्यांनी संधी साधली, तब्बल 65 तोळे सोने आणि 42 हजार रोख रकमेवर डल्ला
घराला कुलूप पाहून चोरट्यांनी संधी साधली, तब्बल 65 तोळे सोने आणि 42 हजार रोख रकमेवर डल्ला
| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 2:41 PM
Share

नाशिक : नाशिकच्या सातपूर परिसरात एक जबरी चोरीची घटना समोर आली आहे. सातपूर कॉलनीत राहणारे साहेबराव नेमणार हे आपल्या कुटुंबासोबत गावी गेले असताना संबंधित चोरीची घटना घडली. घराला कुलूप असल्याचं बघून चोरट्यांनी संधी साधत दरवाज्याची कडी तोडून घरातील मोठ्या मुद्देमालावर डल्ला मारला. संबंधित चोरीची घटना शनिवारी (5 जून) मध्यरात्री घडली. साहेबराव नेमणार सकाळी कुटुंबासह घरी आले तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता. त्यावरुन त्यांना घरात चोरी झाल्याचा अंदाज आला. त्यांनी घरात शिरल्यानंतर पाहणी केली असता त्यांना चोरीची घटना खरी असल्याची खात्री पटली (Thieves entered the house in Nashik and stole jewellery and money).

परिसरातील नागरिक चिंतेत

चोरट्यांनी घरातील तब्बल 65 तोळे सोने आणि 42 हजार रोख रक्कम असा मोठा ऐवज पळवून नेला. या घटनेमुळे सातपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरात एवढी दाट वस्ती असताना, चहूबाजूने नागरिक राहत असताना चोरटे एवढी मोठी हिंमत कशी करु शकतात? त्यांना पोलिसांचं भय वाटत नाही का? असे प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात चर्चा सुरु झालीय (Thieves entered the house in Nashik and stole jewellery and money).

पोलिसांत तक्रार दाखल

साहेबराव नेमणार गावाहून घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याची घटना माहित पडल्यानंतर ते आतूनच खूप खचले आहेत. त्यांनी वेळ न दडवता तातडीने सातपूर पोलीस ठाणे गाठलं. तिथे त्यांनी पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी सर्व घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर ते साहेबराव यांच्यासोबत लगेच त्यांच्या घरी पाहणी करण्यासाठी गेले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार नोंद केली असून त्यांनी तपास सुरु केला आहे.

पोलिसांचा तपास सुरु

भर वस्ती असताना चोरटे कसे आले, ते कुठून आले. परिसरात कुठे सीसीटीव्ही आहेत का, त्यामध्ये चोरटे कैद झाले आहेत का? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. ते लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळतील, अशी आशा साहेबराव नेमणार यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या :

प्रसिद्ध न्यूज चॅनेलचा अँकर हनी ट्रॅपमध्ये अडकला, मोबाईल आणि कारसह तरुणीचा पोबारा

नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या, मुलंही झोपली, प्रियकर आला, तोच पतीला जाग आली आणि…

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.