नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या, मुलंही झोपली, प्रियकर आला, तोच पतीला जाग आली आणि…

गुंडांनी आपल्या पतीची हत्या केल्याचा बनाव पत्नीने रचला होता, मात्र दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला (Delhi wife kills Husband )

नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या, मुलंही झोपली, प्रियकर आला, तोच पतीला जाग आली आणि...
पतीच्या हत्येप्रकरणी महिलेला अटक

नवी दिल्ली : गुंडांनी पतीची हत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या पत्नीचा दिल्ली पोलिसांनी भांडाफोड केला. महिलेने प्रियकराच्या साथीनेच आपल्या पतीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मुलं आणि मोलकरीण घरात असताना त्यांच्या नकळत महिलेने पतीची हत्या केली. आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली असून प्रियकर पसार झाला आहे. (Delhi wife kills Husband with Boyfriend)

गुंडांनी पतीची हत्या केल्याचा बनाव

दिल्ली पोलिसांना निहारमधील निलोठी एक्स्टेंशन भागात 35 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याचं 3 मे रोजी समजलं होतं. अनिल साहू नावाच्या तरुणाची राहत्या घरी हत्या झाली होती. गुंडांनी आपल्या पतीची हत्या केल्याचा बनाव त्याची पत्नी भुवनेश्वरी देवी उर्फ पिंकीने रचला होता. पोलिसांनी पिंकीची अनेक तास कसून चौकशी केली, तेव्हा त्यांचा महिलेवरील संशय बळावला. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने हत्येची कबुली दिली.

मालमत्तेच्या वादातून पतीची हत्या

झारखंडमधील धनवारमध्ये असलेल्या मालमत्तेच्या वादातून पतीची हत्या केल्याचं पिंकीने सांगितलं. यावरुन दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. हत्येच्या वेळी दोन अल्पवयीन मुलं आणि दोन मोलकरणी माया आणि ज्योतीही घरात होत्या, असं पिंकीने सांगितलं.

पतीचे अनेक महिलांशी विवाहबाह्य संबंध 

दिल्लीत राहणाऱ्या मयत अनिल साहूचे अनेक महिलांशी विवाहबाह्य संबंध होते, असा दावा पिंकीने केला आहे. यावरुन दोघांमध्ये अनेक वेळा वाद झडत असल्याचंही समजतं. तर आरोपी पिंकीचे राज नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. अनिलने आक्षेप घेतल्यामुळे पिंकीने पतीचा काटा काढण्याचा कट प्रियकराच्या साथीने रचला.

‘त्या’ रात्री काय घडलं?

दोन जूनच्या रात्री अनिल साहू घरी आला, तेव्हा पिंकीने त्याला जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तिने राजला घरी बोलावलं. दोघांनी मिळून अनिलचे हातपाय दोरखंडाने बांधले. दोघंही त्याचा जीव घेण्याच्या तयारीत असताना अनिल शुद्धीवर आला. त्यावेळी राज आणि अनिल यांच्यात मारमारी झाली. मात्र पिंकीने आपल्या नवऱ्याला पकडलं आणि राजने धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. हत्येनंतर प्रियकर राजने घटनास्थळावरुन पोबारा केला, तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पत्नीने गुंडांनी घरात घुसून पतीची हत्या केल्याचा बनाव रचला. राजच्या शोधासाठी पोलिसांची छापेमारी सुरु आहे.

संबंधित बातम्या :

दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, मुलीने पोलिसांना सांगितलं बाबांना किचनमध्ये पुरलंय!

पाच मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, प्रियकराच्या साथीने पतीची हत्या

(Delhi wife kills Husband with Boyfriend)