दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला

महिलेने फक्त दीर मोहनच्या हत्येविषयीच नाही, तर पाच वर्षांपूर्वी केलेल्या पतीच्या हत्येचाही पाढा वाचला. (brother in law Husband)

दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला
भोपाळमध्ये महिलेला पती, दीराच्या हत्ये प्रकरणी अटक
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 1:26 PM

भोपाळ : तरुणाच्या हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना चक्रावून सोडणारी माहिती मिळाली. दिराची हत्या केल्याप्रकरणी वहिनीची चौकशी सुरु होती. त्यावेळी महिलेने पाच वर्षांपूर्वी केलेल्या पतीच्या हत्येचं गुपितही फोडलं. ज्या दिराच्या साथीने तिने पाच वर्षांपूर्वी नवऱ्याची हत्या केली होती, त्याच दिराचाही तिने आता जीव घेतला. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. (Bhopal woman kills brother in law for whom she killed Husband five years ago)

दिराचा मृतदेह नदीकिनारी सापडला

भोपाळमधील कोलार भागात पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह सापडला. या मृतदेहाचा डुक्कर फडशा पाडत होते. पोलिसांनी तपास सुरु करताच दामाखेडा भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या मोहन नावाच्या तरुणाचा हा मृतदेह असल्याचं पोलिसांना समजलं. मोहन आपली वहिनी आणि तिच्या मुलासोबत राहत होता. त्यामुळे पोलिसांनी वहिनीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

दिराच्या साथीने पतीच्या हत्येची कबुली

पोलिसांनी हिसका दाखवताच वहिनीने घडाघडा गुन्ह्यांची कबुली दिली. तिने फक्त दीर मोहनच्या हत्येविषयीच नाही, तर पाच वर्षांपूर्वी केलेल्या पतीच्या हत्येचाही पाढा वाचला. दिरासोबत राहता यावं, म्हणून त्याच्या मदतीनेच आपण पतीची हत्या केली होती. त्यानंतर पतीचा मृतदेह घरातच पुरला होता, अशी माहिती तिने पोलिसांना दिली. त्यामुळे एका खुनाचा तपास करणाऱ्या पोलिसांसमोर हत्येचे जुने प्रकरणही उघडकीस आले. तिच्या जबाबानुसार शनिवारी रात्री पोलिसांनी घरात खोदकाम केले. त्यावेळी पोलिसांना सांगाडा मिळाला. पोलिसांनी तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

मुलासोबत आता दिराचीही हत्या

पतीच्या हत्येनंतर महिला दीर आणि मुलासोबत त्याच घरात राहत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिरासोबत तिचे वारंवार खटके उडत होते. त्यामुळे मुलाच्या मदतीने तिने दिराची हत्या केली. त्यानंतर मुलाने त्याचा मृतदेह कलियासोत नदीत टाकला. तिथे डुकरांनी त्याचा मृतदेह कुरतडण्यास सुरुवातही केली होती. मात्र पोलिसांना याची खबर मिळाली, आणि अवघ्या चोवीस तासात या खुनासोबतच पाच वर्ष जुन्या हत्येचाही पर्दाफाश झाला.

संबंधित बातम्या :

19 वर्षीय तरुणाचा राग, सोसायटीच्या दोन सुरक्षा रक्षकांनी पोटात चाकू खुपसला, मीरा भाईंदर हादरलं !

तृतीयपंथीयाकडे लैंगिक संबंधांची मागणी, मुंबईत तरुणाची हत्या, आरोपी एकाच कुटुंबातील चौघे

(Bhopal woman kills brother in law for whom she killed Husband five years ago)

Non Stop LIVE Update
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?.
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?.
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा.
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?.
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब.
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय.
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव.
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल.
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?.