पाच मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, प्रियकराच्या साथीने पतीची हत्या

पती नोकरीनिमित्त राज्याबाहेर होता. तर दोन मुलींचा विवाह झाल्याने त्याही गावाबाहेर राहतात. गावात राहणाऱ्या तरुणावर महिलेचा जीव जडला (Mother of Five kills Husband with Boyfriend)

पाच मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, प्रियकराच्या साथीने पतीची हत्या

लखनौ : पाच मुलांच्या आईने प्रियकराच्या साथीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लॉकडाऊनच्या काळात पती गावी परतल्यामुळे दोघांच्या प्रेमसंबंधांत अडसर निर्माण झाला आणि दोघांनी मिळून पतीचा काटा काढला. हत्येनंतर पसार झालेल्या प्रेमी युगुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये ही घटना घडली. (Uttar Pradesh Mother of Five kills Husband with Boyfriend)

गावातील तरुणावर जीव जडला

लंभुआ कोतवाली भागातील परशुरामपुर चौबनवां गावात आरोपी महिला कमला देवी आपल्या मुलांसह राहत होती. तिचा पती चंद्रपाल नोकरीनिमित्त राज्याबाहेर होता. तर दोन मुलींचा विवाह झाल्याने त्याही गावाबाहेर राहतात. गावात राहणाऱ्या अजय कुमारवर कमलादेवीचा जीव जडला. दोघांच्या लपूनछपून भेटीगाठी वाढू लागल्या.

लॉकडाऊनमुळे पती घरी परतला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे चंद्रपाल घरी परतला. त्यामुळे अजय आणि कमला यांच्या प्रेम प्रकरणात अडसर निर्माण होऊ लागला. अखेर दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचा कट रचला. 30 मे रोजी चंद्रपाल नातेवाईकांच्या लग्नानिमित्त अनंतपूर चौबेपूर गावात गेला होता. तिथून परत येताना परसीपूर गावाजवळ अजय कुमारने डोक्यात हातोडा घालून चंद्रपालची हत्या केली.

चंद्रपालच्या वडिलांना आपल्या सुनेवर संशय होताच. त्यातच सून घरातून पसार झाल्यामुळे त्यांना खात्री पटली. त्यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर सून आणि तिच्या प्रियकराविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बागेतून प्रेमी युगुलाला अटक

लंभुआ रेलवे स्टेशनजवळील बागेतून प्रेमी युगुलाला अटक करण्यात आली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी हत्येसाठी वापरलेला हातोडा आणि रक्ताने माखलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत.

किचनमध्ये पुरुन टाईल्स लावल्या

दुसरीकडे, प्रियकराच्या साथीने महिलेने आपल्याच पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दोनच दिवसांपूर्वी मुंबईत उघडकीस आला होता. हत्येनंतर महिलेने किचनमध्ये खड्डा खोदून पतीचा मृतदेह पुरला. खड्डा बुजवून त्यावर टाईल्सही लावल्या. त्यानंतर जणू काही झालंच नाही, अशा आविर्भावात ती राहत होती. मात्र महिलेच्या सहा वर्षांच्या मुलीमुळेच या प्रकाराचा पर्दाफाश झाला. आईने बाबांना किचनमध्ये पुरल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. आरोपी पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तिचा बॉयफ्रेण्ड पसार झाला.

संबंधित बातम्या :

दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, मुलीने पोलिसांना सांगितलं बाबांना किचनमध्ये पुरलंय!

(Uttar Pradesh Mother of Five kills Husband with Boyfriend)