प्रसिद्ध न्यूज चॅनेलचा अँकर हनी ट्रॅपमध्ये अडकला, मोबाईल आणि कारसह तरुणीचा पोबारा

प्रसिद्ध न्यूज चॅनेलचा अँकर हनी ट्रॅपमध्ये अडकला, मोबाईल आणि कारसह तरुणीचा पोबारा

अँकर आणि संबंधित तरुणीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ शूट करुन दोन लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे (Honey Trap News Channel Anchor)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 06, 2021 | 8:20 AM

नवी दिल्ली : प्रसिद्ध वृत्तवाहिनीचा वृत्त निवेदक हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पीडित तरुणाच्या तक्रारीनुसार पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. युवतीने घरी बोलावून साथीदारांच्या मदतीने लुटल्याचा आरोप तरुणाने केला आहे. मोबाईल, रोकड आणि कारसह तरुणीने पोबारा केल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. (Noida Crime Honey Trap News Channel Anchor looted Five arrested in Uttar Pradesh)

मॉलमध्ये तरुणीशी भेट

सोनू, पूरन पाल, लक्की, काजल उर्फ सना, दीपा चौहान आणि कुलदीप कुमार या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित वृत्त निवेदकाच्या माहितीनुसार सात महिन्यांपूर्वी त्याची ओळख नोएडा सेक्टर-18 मधील जीआयपी मॉलमध्ये काजल नावाच्या तरुणीशी झाली. तिचंच नाव सना. भेटीत दोघांनी फोन नंबर एक्स्चेंज केले. त्यानंतर दोघांच्या गप्पा वाढल्या. 3 जूनला काजलने नोएडातील एका ठिकाणी अँकरला भेटायला बोलावले. त्यानंतर की त्याला एका सोसायटीमध्ये घेऊन गेली.

आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ शूट

काजलने नेलेल्या घरात दीपा चौहान नावाची तरुणी आधीपासूनच बसली होती. त्यानंतर तिघांनी एकत्र बिअर प्यायली. इतक्यात आणखी तिघे जण तिथे आले. त्यांनी अँकर आणि संबंधित तरुणींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ शूट केले. मारहाण करुन आरोपींनी त्याला ओलिस ठेवले. आरोपींनी त्याच्याकडे दोन लाखांची मागणी केली. मात्र त्यावेळी इतके पैसे नसल्याचे अँकरने सांगितले. अखेर त्याचे दोन मोबाईल, 25 हजारांची रोकड आणि होंडा सिटी कारची चावी घेऊन त्यांनी पोबारा केला. पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली होती. पीडित तरुणाने हिमतीने तक्रार दिल्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या :

अहमदनगरमध्ये हनी ट्रॅपचं सत्र सुरुच, क्लास वन अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडीओ काढून 3 कोटी मागितले

लॉजवर भेट, बलात्काराच्या खोट्या केसची धमकी देत 20 लाखांची मागणी, मुंबईत हनी ट्रॅप

फेसबुकवरुन ओळख, हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या तरुणीची मुंबईत गळा दाबून हत्या

(Noida Crime Honey Trap News Channel Anchor looted Five arrested in Uttar Pradesh)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें