Nashik Weather: नाशिकमध्ये दोन दिवस मोठा पाऊस नाही, पावसाळा लांबण्याची शक्यता

| Updated on: Sep 11, 2021 | 11:23 AM

अतिवृष्टीने झोडपून काढलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) येत्या दोन दिवसांत मोठा पाऊस (heavy rain) होण्याची शक्यता नाही, असा अंदाज हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, शनिवारी (11 सप्टेंबर) सकाळी नाशिक शहरात भुरभुर पावसाने हजेरी लावली होती.

Nashik Weather: नाशिकमध्ये दोन दिवस मोठा पाऊस नाही, पावसाळा लांबण्याची शक्यता
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी वाढले आहे.
Follow us on

नाशिकः  अतिवृष्टीने झोडपून काढलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) येत्या दोन दिवसांत मोठा पाऊस (heavy rain) होण्याची शक्यता नाही, असा अंदाज हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, शनिवारी (11 सप्टेंबर) सकाळी नाशिक शहरात भुरभुर पावसाने हजेरी लावली होती. (Nashik, North Maharashtra will not get heavy rain in two days)

गेल्या दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात पीके तर आडवी झालीच, सोबतच 7 हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या असून, १०४ घरांची पडझड झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक पंचनाम्यात उघड झाले आहे. या विनाशकारी पावसाचा तब्बल 152 गावांमधील 69 हजार 269 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पावसाने फळबागा, मका, बाजरी, कापूर, सोयाबीन, भुईमुगाचे अतोनात नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. इथे बारा वर्षांत पहिल्यांदा इतका पाऊस पडला आहे. 12 तासांमध्ये 121 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले असून, खरीप हंगाम हातचा गेला आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. धरणे भरत आली आहेत. शनिवारी सकाळपासून शहरात पावसाची भुरभुर सुरू होती. पावसाच्या अंदाजाबाबत औंधकर यांना विचारले असता ते म्हणाले की, सध्या कमी दाबाचा पट्टा हा गुजरात आणि मध्य प्रदेशातील दक्षिण-पश्चिम भागाकडे सरकत आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता दिसत नाही. विशेष म्हणजे अजून परतीचा पाऊस सुंरू झालेला नाही. सध्या भारतीय समुद्रीक स्थिरांक हा निगेटिव्ह होत आहे. त्यामुळे अरबी समुद्राकडे येणाऱ्या पावसाची तीव्रता कमी होईल. यंदा पावसाळा लांबण्याची शक्यताही औंधकर यांनी वर्तवली आहे.

महाराष्ट्रात चार दिवसांत मुसळधार

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे राज्यात येत्या 4, 5 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यामुळे ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आले आहेत.

धरणे तुडूंब

सध्या जिल्ह्यातील 24 प्रकल्पांत 68 टक्के, गंगापूर समूहात 85 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात 628 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टी झालेल्या नांदगाव व मनमाड तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली आहे. सर्वाधिक 123 मिमी पाऊस एकट्या नांदगाव तालुक्यात नोंदवला असून, जिल्ह्यात आतापर्यंत 76.67 टक्के पाऊस झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत मोठ्या पावसाची शक्यता नाही. सध्या भारतीय समुद्रीक स्थिरांक हा निगेटिव्ह होत आहे. त्यामुळे अरबी समुद्राकडे येणाऱ्या पावसाची तीव्रता कमी होईल. अजून परतीचा पाऊस सुरू झालेला नसून, यंदा पावसाळा लांबण्याची शक्यता आहे.
– श्रीनिवास औंधकर, संचालक, एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, एमजीएम, औरंगाबाद  (Nashik, North Maharashtra will not get heavy rain in two days)

इतर बातम्याः 

नाशिकमध्ये ई बाइकला मागणी, सीएनजी कारला वर्षाची वेटिंग

नाशिकमध्ये सोने 47600 वर, चांदी 1300 रुपयांनी महाग