AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! निदा खानच्या सुनावणीदरम्यान भगवान श्रीकृष्णाचा दाखला, कोर्टात काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक येथील निदा खान प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना कोर्टात न्यायालयाने भगवान श्रीकृष्णाचा दाखला दिला आहे.

मोठी बातमी! निदा खानच्या सुनावणीदरम्यान भगवान श्रीकृष्णाचा दाखला, कोर्टात काय घडलं?
Nida KhanImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 10, 2026 | 11:21 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनी धर्मांतर आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला पोलिसांनी अटक केली. पण निदा खान गर्भवती असल्याने कोर्टाने तिला जामीन मंजूर केला. कोर्टाचा हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता. पण तिची जामीन अर्ज स्वीकारताना स्थानिक कोर्टाने म्हटले की, तुरुंगात मुलाला जन्म देण्याची वेदना कोणत्याही महिलेसाठी असह्य असते.

कोर्टाने या संदर्भात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उल्लेखही केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (नाशिक रोड) के. जी. जोशी यांनी म्हटले की, टीसीएस प्रकरणातील चौकशीत प्रथमदर्शनी असे दिसते की, निदा खानने इतर सहआरोपींसोबत मिळून पीडितेला मानसिकदृष्ट्या प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. तिची विचारसरणी आणि धर्म बदलण्याचा प्रयत्न केला.

गर्भावस्थेमुळे जामीन मंजूर

लैंगिक छळ आणि धर्मांतरणाशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचा उल्लेख करताना न्यायाधीश म्हणाले की, आरोपींनी पीडितेला हिंदू धर्म ठीक नाही असे म्हणत तिचा विश्वास संपादन केला. सुमारे दोन महिन्यापूर्वी अटक झालेल्या निदा खानला ६ जुलै रोजी कोर्टाने जामीन दिला होता. या संबंधातील विस्तृत आदेश गुरुवारी उपलब्ध झाला. न्यायाधीशांनी आदेशात म्हटले की, एफआयआरमध्ये खान यांची भूमिका स्पष्टपणे उल्लेखित आहे.

75 हजर रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर

निदा पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात घेऊन कोर्टाने तिचा जामीन अर्ज स्वीकारला आहे. न्यायाधीश म्हणाले, “आरोपी गर्भवती आहे. याशिवाय या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे आणि चार्जशीटही दाखल झाली आहे. अशा परिस्थितीत तिला न्यायिक हवालात ठेवण्याचे कोणतेही औचित्य नाही.”

नाशिकमधील घटनेनंतर निदा खान अटकेच्या भीतीने फरार झाली होती. या काळात तिने पोलिसांना चकवा देण्यासाठी सातत्याने आपली ठिकाणे बदलत राहिली. यानंतर तपासातून काही महत्त्वाची माहिती समोर आली. त्यानुसार, निदा खानने सर्वात आधी ठाणे गाठले, त्यानंतर काही दिवस तिने भिवंडीत आश्रय घेतला. यानंतर तिने मुंबई आणि सोलापूरमधील आपल्या नातेवाईकांकडे मुक्काम ठोकला. निदा खानने मालेगावमध्ये स्थानिक स्तरावर मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण तिथे तिचे प्रयत्न अपयशी ठरले. आता तिला या प्रकरणात जामीन मंजुर झाला आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ