.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, गोमास तस्करीच्या संशयावरून घडली ही भयानक घटना

इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा पंधरा दिवसांच्या अंतराने धक्कादायक घटना घडली. गोमांस तस्करीच्या संशयावरून एका गटाने तरुणाची हत्या केली. या घटनेने इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली.

धक्कादायक, गोमास तस्करीच्या संशयावरून घडली ही भयानक घटना
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 25, 2023 | 6:18 PM
Share

प्रतिनिधी, नाशिक : इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा पंधरा दिवसांच्या अंतराने धक्कादायक घटना घडली. गोमांस तस्करीच्या संशयावरून एका गटाने तरुणाची हत्या केली. या घटनेने इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली. आफन अन्सारी असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. या हाणामारीत दुसरा तरुणही गंभीर जखमी झाला. जखमीवर धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

दहा जणांकडून लोखंडी राडने मारहाण

इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. एसएमबीटी कॉलेजजवळ रविवारी मध्यरात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गोमांस घेऊन जाण्याच्या संशयावरून स्विफ्ट कार MH02 BJ 6525 अडवण्यात आली. कारमधील दोन व्यक्तींना दहा ते पंधरा जणांच्या जमावाकडून लोखंडी रॉड आणि दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली.

दहा संशयित ताब्यात

या मारहाणीत अफान अफान अब्दुल मजीद अंसारी (वय ३२ वर्षे रा. राहणार कुरेशीनगर, कुर्ला पूर्व) याचा मृत्यू झाला. तर, नासीर हुसेन कुरेशी (वय २४ वर्षे, रा. कुर्ला पूर्व) हा गंभीर जखमी झाला. घटनास्थळी पोहचून पोलिसांनी १० संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक सुनील भामरे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट दिली. उर्वरीत आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्विफ्ट कारमध्ये गोमांस घेऊन जाण्याच्या संशयातून दोघांना मारहाण करण्यात आली. यात एकाचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास तपास करीत आहे.

पंधरा दिवसांपूर्वी अशीच एक घटना

पंधरा दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यात असाच एक प्रकार घडला होता. कसारा घाट परिसरात एका जमावाकडून गोमांस वाहतूक तस्करीच्या संशयातून गाडी अडवण्यात आली होती. यावेळी दोन गटात झालेल्या बाचाबाचीत दोघांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. यावेळी जमाव मारहाण करीत असल्याने एक जण जीव वाचवण्यासाठी अंधारात पळून गेला.

मात्र अंधारात पळताना तो थेट २५० फुट खोल दरीत पडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. तर, एक जण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पंधरा दिवसाच्या अंतराने तशीच घटना घडली.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर