AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात मोठा राजकीय भूकंप? स्फोटक माहिती राज्यासमोर? PA नीरज जाधव याच्या तपासात मोठे खुलासे? त्या CCTV मध्ये काय?

Ashok Kharat PA Neeraj Jadhav: पोलिसांनी भोंदू ज्योतिषी अशोक खरात याला अटक केल्यानंतर त्याचा पीए, ऑफिसबॉय नीरज जाधव याच्याही मुसक्या आवळल्या. महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे CCTV त्याच्याकडे आहे. तर खरातच्या काळ्या करानाम्याची कुंडलीही त्याच्याकडे आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात मोठा राजकीय भूकंप? स्फोटक माहिती राज्यासमोर? PA नीरज जाधव याच्या तपासात मोठे खुलासे? त्या CCTV मध्ये काय?
अशोक खरात, नीरज जाधवImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 21, 2026 | 10:24 AM
Share

Ashok Kharat PA Neeraj Jadhav: नाशिकचा भोंदू आणि ज्योतिषी अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याने शिर्डी, नाशिक पट्ट्यात बळजबरीने जमीन बळकावल्याचे, त्यासाठी धमक्या दिल्याची माहिती समोर येत आहे. तर या खरातचं बिंग फोडणारा त्याचा पीए आणि ऑफिसबॉय नीरज जाधव याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडे महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे सर्व CCTV असल्याचे सांगण्यात येत आहे. तर खरातचे सर्व काळे कारनामे त्याला माहिती आहेत, त्यामुळे त्याने पोलिसांना काय काय माहिती दिली आणि तो काय लपवत आहे, हे समोर येणार आहे. आज नीरज जाधव याला न्यायालयासमोर हजर करण्याची शक्यता आहे.

आज कोर्टात हजर करणार?

भोंदू कॅप्टन खरातचा PA नीरज जाधव याला पोलिस आज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. काल संध्याकाळी नीरज जाधवला क्राइम ब्रँचने ताब्यात घेतले होते. कॅप्टन खरातचे सगळे CCTV नीरज जाधव याच्याकडे आहे. इतकेच नाही तर खरातचे सर्व काळे कारनामे, त्याने केलेले आर्थिक व्यवहार, त्यासाठी त्याने वापरलेले राजकीय बळ, केलेली दमदाटी याची सर्व माहिती नीरज जाधव याला आहे. तो सावलीसारखा त्याच्यासोबत राहायचा. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणात अजून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय महाभूंकप होणार?

ज्योतिषी अशोक खरात याचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यातील काही AI च्या आधारे तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. तर संजय राऊत यांच्या दाव्यानुसार, राज्याच्या मंत्रिमंडळातील 9 मंत्र्यांचा खरातशी थेट संबंध होता. ते मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी त्याच्याकडे जात होते. तर यातील काहींची त्याच्याशी व्यवसायिक भागीदारी होती असा आरोपही होत आहे. खरातचे राजकीय आणि VIP लागेबांधे याची नीरज जाधवला संपूर्ण माहिती होते. कोणते मंत्री, खासदार, आमदार याच्याशी खरातने कोणती अर्थपूर्ण डील केली याची खडानखडा माहिती त्याच्याकडे असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे नीरज जाधवकडून आणखी ही काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात उचलून धरण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला याप्रकरणी चांगलेच धारेवर धरले आहे. याप्रकरणी इतरांवर कारवाईची मागणी विरोधक करत आहेत. ज्या बड्या नेत्यांनी खरात याला विविध प्रकारे मदत केली, ते आता गोत्यात येण्याची शक्यता आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!