VIDEO | शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करुन द्या; सदाभाऊ खोत बैल आणि नांगर घेऊन बँकेसमोर

| Updated on: Jun 28, 2021 | 10:37 PM

शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर बैल आणि नांगर घेऊन निदर्शने करण्यात आली.

VIDEO | शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करुन द्या; सदाभाऊ खोत बैल आणि नांगर घेऊन बँकेसमोर
Sadabhau khot
Follow us on

नाशिक : शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर बैल आणि नांगर घेऊन निदर्शने करण्यात आली. राज्यामध्ये खरीप हंगाम संपत आला तरी राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त पीक कर्जाचे वाटप झालेले नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. (Provide crop loans to farmers, Sadabhau khot protest in front of Nashik bank)

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेमध्ये अनेक गैरव्यवहार, भ्रष्टाचार झाल्यामुळे बँकेचे दैनंदिन व्यवहार बंद पडले आहेत. त्यातच या बँकने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, ट्रक्टर, वाहनांचे लिलाव काढले आहेत. हा शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी सदर लिलाव त्वरित बंद करावेत, शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची पुर्नबांधणी करावी, शेतकऱ्यांना त्वरित नव्याने कर्जवाटप करावे, शेतकऱ्यांच्या बचत खात्यातील ठेवी आहेत त्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर वर्ग कराव्यात, अशा विविध मागण्या करत जिल्हा बॅकेसमोर माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेने व भाजपाने आंदोलन केले.

यावेळी बॅकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाली, तसेच सहकार मंत्री यांच्याशी फोन वरुन संपर्क करण्यात आला, परंतु त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात उग्र आंदोलन करण्यात येईल, असे प्रशासनाला सांगण्यात आले.

यावेळी माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत, भाजपा खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आ. अॅड. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, रयतचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष दिपकबापू पगार, रयतचे प्रवक्ते भानुदास शिंदे, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे आणि जिल्ह्यातील शेतकरी वर्ग उपस्थित होता.

व्हिडीओ पाहा

इतर बातम्या

कोरोना काळात नाशिकमधून 69 मुली घरातून पळाल्या, सोशल मीडियावरील मैत्रीतून पाऊल

इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये पोलिसांचा छापा, ‘बिग बॉस’ फेम महिलेसह 22 जणांची रेव्ह पार्टी

नाशिकमध्ये वाढीव शाळा फीचा वाद पेटला, पालकांची आक्रमक भूमिका, पोलिसांची मध्यस्थी

(Provide crop loans to farmers, Sadabhau khot protest in front of Nashik bank)