कोरोना काळात नाशिकमधून 69 मुली घरातून पळाल्या, सोशल मीडियावरील मैत्रीतून पाऊल

कोरोनाच्या संकटात शाळा बंद असल्याने राज्य शासनाने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. मात्र हातात आलेल्या स्मार्ट फोनचा काही जणांनी चांगला उपयोग केला, तर काहींनी वाईट.

कोरोना काळात नाशिकमधून 69 मुली घरातून पळाल्या, सोशल मीडियावरील मैत्रीतून पाऊल
प्रातिनिधिक फोटो

नाशिक : नाशिक शहरात कोरोना काळात तब्बल 69 मुली आपलं घर सोडून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 18 वर्षांखालील मुलींचा समावेश आहे. अवघ्या दीड वर्षांच्या काळात नाशिक शहरातील 69 मुलींनी घर सोडत आपला प्रियकर किंवा इतर वेगवेगळ्या भूलथापांना बळी पडत पळ काढला. मागील वर्षाच्या काळात 37 तर या वर्षात 17 मुलींना आपल्या घरी पाठवण्यात पोलिसांना यश आलं आहे. (Nashik City 69 girls fled away from Home during Corona Lockdown)

सोशल मीडियावर मित्रांच्या जाळ्यात

कोरोनाच्या संकटात शाळा बंद असल्याने राज्य शासनाने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. मात्र हातात आलेल्या स्मार्ट फोनचा काही जणांनी चांगला उपयोग केला, तर काहींनी वाईट. सतत मोबाईलचा वापर असल्याने व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यासारख्या सोशल माध्यमांमुळे अनेकांची नवीन व्यक्तींसोबत मैत्री झाली. मात्र ती मैत्री इतकी वाढत ही गेली की, काहींनी प्रेमाच्या आणाभाका घेत आपलं घर सोडायलाही मागेपुढे पाहिलं नाही.

संवादाच्या अभावाने कुटुंबीयांपासून दूर

याला कारणीभूत ठरतो तो घरातील कमी झालेला संवाद. कारण सध्याच्या काळात प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतो. आपला मुलगा, मुलगी, बहीण, बायको किंवा इतर नातेवाईक काय करतात, याकडे त्यांचं लक्ष नसतं. संवाद असला तर आपल्याला सर्वांच्या भावना कळतात आणि हेच कमी पडलं तर मग मुलं, मुली चुकीचा निर्णय घेऊन मोकळे होतात. आपल्याला नंतर पश्चाताप होतो. त्यामुळे आपल्या घरातील सदस्यांशी नेहमी संवाद ठेवा, प्रश्न सुटतील आणि अशी वेळ मग येणार नाही.

संबंधित बातम्या :

CCTV दुरुस्तीच्या निमित्ताने मोबाईलवर अ‍ॅक्सेस, दाम्पत्याच्या बेडरुममधले व्हिडीओ तंत्रज्ञाकडून रेकॉर्ड

प्रेम केलं, अल्पवयीन मुलीला पळवून आणलं, पण अखेर करुण अंत, तरुणाची मन हेलावून टाकणारी कहाणी

गुगलवर Nagpur Murder ला दोन लाखाहून अधिक सर्च, गुन्हेगारीचा नागपूरच्या गुंतवणुकीवरही परिणाम

(Nashik City 69 girls fled away from Home during Corona Lockdown)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI