गुगलवर Nagpur Murder ला दोन लाखाहून अधिक सर्च, गुन्हेगारीचा नागपूरच्या गुंतवणुकीवरही परिणाम

इंटरनेटवर नागपूर सर्च केल्यास गुन्ह्याच्या अनेक घटना समोर येतात. गुगलवर नागपूर मर्डर म्हणून सर्च केल्यास 33 सेकंदात 2 लाख 66 रिझल्ट दाखवत होते. मुंबईपेक्षाही हा आकडा जास्त आहे

गुगलवर Nagpur Murder ला दोन लाखाहून अधिक सर्च, गुन्हेगारीचा नागपूरच्या गुंतवणुकीवरही परिणाम
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 1:57 PM

नागपूर : नागपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी योगेश डोंगरे या तरुणाच्या हत्येचा लाईव्ह व्हिडीओ शूट करण्यात आला होता. त्यानंतर समाजमाध्यमात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. काही महिन्यांपूर्वी नागपुरातील खुनाचा असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. गुगलवर Nagpur Murder ला दोन लाखाहून अधिक सर्च रिझल्ट मिळत आहेत. त्यामुळेच समाज माध्यमात नागपूरची ओळख क्राईम सिटी म्हणून होत आहे. याचा शहरातील गुंतवणूक, शैक्षणिक आणि इतर विकासावर परिणाम होतोय. (Nagpur Murder Google search leads to bad impression of city on Internet)

शहरातील गुंतवणूकीवर मोठा परिणाम

इंटरनेटवर नागपूर सर्च केल्यास गुन्ह्याच्या अनेक घटना समोर येतात. गुगलवर नागपूर मर्डर म्हणून सर्च केल्यास 33 सेकंदात 2 लाख 66 रिझल्ट दाखवत होते. मुंबईपेक्षाही हा आकडा जास्त आहे. “देश-विदेशातील उद्योजक गुंतवणुकीसाठी इंटरनेटवर नागपूर सर्च करतात, तेव्हा गुन्ह्याच्या या घटना पुढे येतात. त्यामुळे शहरातील गुंतवणूकीवर मोठा परिणाम होतो” असं मत सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केलं आहे. मिहानसह इतर औद्योगिक वसाहतीत जागा रिकाम्या आहेत, फारसे उद्योजक येत नाही, कारण त्यांच्या कर्मचाऱ्यांची नागपुरात राहण्यास नापसंती असते, असंही पारसे म्हणाले.

सोशल मीडिया तज्ज्ञांचं मत काय?

समाजमाध्यमावरील नागपूरची क्राईम सिटीची इमेज पुसणं गरजेचं आहे. खुनाचे तेच ते लाईव्ह व्हिडीओ व्हायरल होणार नाहीत आणि शहरातील गुन्हेगारी थांबेल, याची काळजी घेणं गरजेचं आहे, असं मत अजित पारसे यांनी व्यक्त केलं आहे. याबाबत नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र लिहिल्याचंही त्यांनी सांगितलं.

हत्यांची आकडेवारी काय सांगते?

नागपूर शहरात एकट्या जून महिन्यातच (23 तारखेपर्यंत) हत्येच्या आठ घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात नागपुरात 45 खून झाले होते, मात्र यंदा जून महिना पूर्ण होण्याआधीच हा आकडा पार झाला आहे. नागपूर शहरात हत्येच्या 47 घटना 2021 मध्ये आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत.

नागपुरात 2018 पासून पहिल्या सहा महिन्यात घडलेल्या खुनाच्या आकडेवारीवर एक नजर

वर्ष – कालावधी – खुनाच्या घटना 2018 – जानेवारी ते जून – 65 खून 2019 – जानेवारी ते जून – 53 खून 2020 – जानेवारी ते जून – 45 खून 2021 – आतापर्यंत – 47 खून

संबंधित बातम्या :

कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यापूर्वी मेव्हणीवर अतिप्रसंग? नागपुरातील हत्याकांडात नवा ट्विस्ट

विवाहबाह्य संबंधातून नागपुरात पत्नीच्या प्रियकराची हत्या, नाल्याचं पाणी लालेलाल

(Nagpur Murder Google search leads to bad impression of city on Internet)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.