
नाशिकमध्ये लस घेण्यासाठी पहाटे 3 वाजल्यापासून रांगा लागल्या आहेत. कारण 3 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शहरात लसीचा साठा उपलब्ध झाला आहे.

लसवंत होण्यासाठी शहरातील विविध भागांतील नागरिकांनी पहाटे 3 ते 4 वाजेपासून लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती.

नाशिकच्या सातपूर परिसरातील राज्य विमा कर्मचारी रुग्णालयाच्या बाहेर लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

गेल्या 3 दिवसापासून शहरात लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद होते.

3 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर लस आल्याने लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी पहाटे लवकरच लसीकरण केंद्रावर गर्दी केली आहे.