3 हजार हेक्टवरील पीक उद्धवस्त; नाशिकमधल्या 4816 शेतकऱ्यांचे नुकसान

| Updated on: Sep 28, 2021 | 4:02 PM

नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने (Heavy rain) शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, तब्बल तीन हजार हेक्टवरील पीक उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

3 हजार हेक्टवरील पीक उद्धवस्त; नाशिकमधल्या 4816 शेतकऱ्यांचे नुकसान
नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
Follow us on

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने (Heavy rain) शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, तब्बल तीन हजार हेक्टवरील पीक उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. (Rain damage to crops on 3,000 hectares; Massive loss of 4816 farmers in Nashik)

यंदा नाशिक जिल्ह्याकडे सुरुवातीला पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे भरली. अनेक ठिकाणी दोन-दोनदा पूर आले. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसाने मालेगाव तालुक्यातल्या सहा गावांना जबर फटका बसला आहे. त्यामुळे तालुक्यातील 4816 शेतकऱ्यांचे तब्बल 3007.53 हेक्टरवरील पीक मातीमोल झाले आहे. पंचायत समितीच्या संयुक्त पथकाने केलेल्या पाहणीत ही भीषण माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कांद्याचे पीक धोक्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदारोप लागवडीसाठी तयार केले होते. मात्र, या रोपाचेही नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने ही रोपे पिवळी चुटूक पडली आहेत. सध्याच्या पावसाने भुईमूग, बाजरी, कापूस, मका, मूग, मठ या पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पावसाने हिरावून नेले आहे. सध्या सोयाबीन, कांद्याचे भाव दिवसेंदिवस उतरत आहेत. शेतकऱ्यांच्या खिशात पैसे नाहीत. अशा स्थितीतमध्ये वीजबिल वसुलीचा तगादा लावू नये. पंजाबच्या धरतीवर वीजबिल माफी करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. सोबतच पावसाने झालेल्या नुकसानीचे पुन्हा एकदा पंचनामे करावे. या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांना पुन्हा धास्ती

मुंबईच्या प्रादेशिक मौसम विज्ञान केंद्राच्या सूचनेनुसार 28 सप्टेंबर रोजी विभागातील नाशिकसह काही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हस्त नक्षत्राला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी सूर्याने हस्त नक्षात्रात प्रवेश केला. या नक्षत्राचा वाहन घोडा आहे. त्यामुळे खंडित स्वरूपाचा पाऊस होईल. यापूर्वीच्या उत्तरा नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने जोरदार पाऊस झाला, असा अंदाज दाते पंचांगामध्ये वर्तवण्यात आला आहे. (Rain damage to crops on 3,000 hectares; Massive loss of 4816 farmers in Nashik)

इतर बातम्याः

नाशिकची जीवनवाहिणी असणारे गंगापूर धरण फुल्ल; आज दुपारी 12 पासून एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू

नाशिकमध्ये पहाटेपासून पावसाची झडझिंबड!