जनलक्ष्मी सहकारी बँकेला 50 लाखांचा दंड, निर्देशांचे पालन न केल्यामुळे RBIचा कारवाईचा बडगा

आरबीआयने नाशिकमधील जनलक्ष्मी सहकारी बँकेला 50 लाख 35 हजारांचा दंड ठोठावला आहे.

जनलक्ष्मी सहकारी बँकेला 50 लाखांचा दंड, निर्देशांचे पालन न केल्यामुळे RBIचा कारवाईचा बडगा
JANALAKSHMI BANK NASHIK
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 6:01 PM

नाशिक : आरबीआयने नाशिकमधील जनलक्ष्मी सहकारी बँकेला 50 लाख 35 हजारांचा दंड ठोठावला आहे. जमा खात्यांमधील रकमेची प्लेसमेंट आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (CICs) संबंधित निर्देशांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. याबाबत जनलक्ष्मी बँकेने अधिक बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, आरबीआयला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असे बँक प्रशासनाने सांगितले आहे. (RBI has imposed fine of rupees 50 lakh 35 thousand on Janalaxmi Sahakari Bank of Nashik)

जनलक्ष्मी बँकेला 50 लाख 35 हजार रुपयांचा दंड

मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील जनलक्ष्मी सहकारी बँकेने आरबीआयच्या नियमांचे पालन केले नाही. बँकेने खात्यांमधील रकमेची प्लेसमेंट आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (Membership of Credit Information Companies (CICs) शी संबंधित निर्देशांचे पालन केले नाही. ही बाब आरबीआयच्या लक्षात आल्यानंतर बँकेवर कारवाई करण्याचे ठऱवले. या कारवाईनुसार आरबीआयने जनलक्ष्मी बँकेला 50 लाख 35 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

आरबीआयच्या नोटिशीला कायदेशीरित्या उत्तर देऊ

दरम्यान, या दंडाबाबत जनलक्ष्मी बँकेकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. तसेच आरबीआयकडून दंडाची नोटीस प्राप्त झाली आहे. मात्र या नोटिशीला आम्ही कायदेशीररित्या उत्तर देऊ, असे बँक प्रशासनाने सांगितले आहे.

इतर बातम्या :

‘..तर माझ्यावर रोज 100 गुन्हे दाखल करा, मी बोलत राहणार’, चित्रा वाघ यांचा मेहबूब शेख यांना प्रत्युत्तर

पूर, दरड समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंटे समिती; तीन महिन्यात अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

अखेर वर्षभरानंतर लोकायुक्तांची नियुक्ती, निवृत्त न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे नवे लोकायुक्त, बुधवारी शपथ होणार

(RBI has imposed fine of rupees 50 lakh 35 thousand on Janalaxmi Sahakari Bank of Nashik)