Ganesh Chaturthi 2021 | पुणे, मुंबईनंतर आता नाशिकमध्ये जमावबंदी, मिरवणूक काढण्यास मज्जाव

| Updated on: Sep 10, 2021 | 8:24 PM

नाशिक शहरात 15 दिवस जमावबंदीचे आदेश नाशिकचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिले आहेत. या आदेशानुसार आता नाशिक शहरात पाचपेक्षा जास्त लोकांना एका ठिकाणी एकत्र येता येणार नाही.

Ganesh Chaturthi 2021 | पुणे, मुंबईनंतर आता नाशिकमध्ये जमावबंदी, मिरवणूक काढण्यास मज्जाव
nashik curfew
Follow us on

नाशिक : कोरोनाची तिसरी संभाव्य लाट तसेच दहा दिवस चालणारा गणोशोत्सव  या सर्व बाबी लक्षात घेता नाशिक शहरात 15 दिवस जमावबंदीचे आदेश नाशिकचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिले आहेत. या आदेशानुसार आता नाशिक शहरात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. तसेच या काळात शहरात मिरवणुकीलादेखील बंदी घालण्यात आली आहे. (section 144 curfew imposed in nashik city amid ganesh chaturthi 2021)

नाशिक शहरात 15 दिवस जमावबंदी

सध्या राज्यात गणेशोत्सवाची धूम आहे. आज म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी नाशिक शहरात गणेश मंडळ तसेच घरांमध्ये गणरायाचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. तर दुसरीकडे राज्य सरकारने कोरोना महामारीचे संकट अजूनही संपलेले नसल्यामुळे गर्दी करु नये असे नागरिकांना आवाहन केले आहे. मात्र, काही ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे नाशिक पोलिसांनी शहरात आगामी पंधरा दिवस जमावबंदी जारी केली आहे. जमावबंदी लागू केल्यामुळे शहरात एका वेळी पाच जणांना एकत्र येण्यास मज्जाव असेल. तसेच गणेश मंडळात प्रत्यक्षपणे दर्शन घेण्यास तसेच मिरवणुकीलादेखील बंदी असेल. लागू करण्यात आलेल्या जमावबंदीचे आदेश झुगारले तर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

मुंबईमध्ये 9 दिवस जमावबंदीचे आदेश

नाशिक शहराबरोबरच पुणे आणि मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलिसांनी मुंबईमध्ये कलम 144 लागू केलंय. जमावबंदी असल्यामुळे गणेशोत्सवात कोणत्याही मिरवणुकांना परवानगी नसेल. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे गणेश मंडळातील गणरायाच्या प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध असेल.

पुण्यातही जमावबंदी

गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी पुण्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 पर्यंत कलम 144 लागू असेल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी 7 हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. या काळात पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

इतर बातम्या :

पवारांनी केलेलं वर्णन काँग्रेसला चपखल बसतं, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला टोला

आता त्यांना ‘तुमचा भुजबळ करू’ असं म्हणता येणार नाही; छगन भुजबळ यांचा भाजपला टोला

देशभरात मंदिरे सुरू, महाराष्ट्रात बंद, गणरायाने सरकारला सुबुद्धी द्यावी; फडणवीसांचं गणरायाला साकडं

(section 144 curfew imposed in nashik city amid ganesh chaturthi 2021)