AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशभरात मंदिरे सुरू, महाराष्ट्रात बंद, गणरायाने सरकारला सुबुद्धी द्यावी; फडणवीसांचं गणरायाला साकडं

देशभरात मंदिरे सुरू आहेत. महाराष्ट्रातच बंद आहे. त्यामुळे या सरकारला सुबुद्धी मिळावी म्हणून गणरायाला साकडे घातले आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. (devendra fadnavis)

देशभरात मंदिरे सुरू, महाराष्ट्रात बंद, गणरायाने सरकारला सुबुद्धी द्यावी; फडणवीसांचं गणरायाला साकडं
devendra fadnavis
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 6:54 PM
Share

मुंबई: मंदिराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. देशभरात मंदिरे सुरू आहेत. महाराष्ट्रातच बंद आहे. त्यामुळे या सरकारला सुबुद्धी मिळावी म्हणून गणरायाला साकडे घातले आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. (devendra fadnavis targets Shiv Sena over temples reopening)

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मंदिरं सुरू करण्याची आमची मागणी केवळ यासाठी आहे की, आम्ही हिंदू आहोत. आमचे 33 कोटी देव आहेत. सगळीकडे, जिथे आम्ही मानू तिथे देव आहे. पण त्यासोबत या मंदिरांवर अवलंबून असलेले लाखो लोक आहेत. कुणी फुलं, कुणी प्रसाद, कुणी उदबत्ती, कुणी हळद-कुंकु विकतंय. मंदिरांवर अवलंबून असलेले पुजारी, तिथले सेवक आहेत. या दोन वर्षाच्या काळात या सगळ्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. म्हणून आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की मदिरालय सुरू होऊ शकतं तर मंदिर का नाही? सरकारनं हवं तर नियमावली लावावी आणि मंदिरं सुरू करावीत. आज देशभरातील मंदिरं सुरू आहेत. फक्त महाराष्ट्रातील मंदिरं बंद आहेत. त्यामुळे गणरायाने सरकारलाही सुबुद्धी द्यावी अशी, असं फडणवीस म्हणाले.

संकटं दूर कर, शेतकऱ्यांना बळ दे

श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. या विघ्नहर्त्याच्या स्थापनेच्या निमित्तानं आपण त्यांना साकडं घालूया की, जगासमोर, देशासमोर, महाराष्ट्रासमोर जे कोरोनाचं संकट आहे, ते संकट आता दूर झालं पाहिजे. आपलं जीवन पूर्वीसारखं सुचारू झालं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रावर जी सारखी संकटं येतात, कधी पुराचं, कधी वादळाचं तर कधी अतिवृष्टीचं, यातूनही आमच्या शेतकऱ्यांना मुक्ती मिळावी. शेतकऱ्याला बळ मिळावं आणि गणरायाने त्यांना आशीर्वाद द्यावा, अशी गणराया चरणी प्रार्थना आहे. त्याचसोबत गणरायाने आपल्या सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि चांगलं काम करण्याची प्रेरणा द्यावी अशीही प्रार्थना आहे, असंही ते म्हणाले.

काँग्रेसची मालावर गुजराण

यावेळे त्यांनी काँग्रेसलाही चिमटे काढले. काँग्रेसचं वर्णन हे शरद पवार यांनी केलेल्या वर्णनापेक्षा वेगळं असूच शकत नाही. कारण काँग्रेस आज जुन्या पुण्याईवर चालली आहे. आमच्या वऱ्हाडात असं म्हणतात की, मालगुजारी तर गेली आता उरलेल्या मालावर गुजराण सुरू आहे. तशा प्रकारचंच वर्णन पवारसाहेबांनी केलं आहे. काँग्रेसला ते चपखल लागू पडतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

बाप्पाचं उत्साहात आगमन

दरम्यान, ना ढोलताशांचा दणदणाट… ना गुलालांची उधळण… ना भव्यदिव्य मिरवणुका… मात्र, तरीही गणपती बाप्पा मोरया… मोरया रे बाप्पा मोरया रे… अशा घोषणा देत विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन झालं. राज्यभर रस्त्यांवरून गणेश मूर्त्या घेऊन जाताना गणेश भक्त दिसत होते. मात्र, रस्त्यावर नेहमीसारखी गर्दी नसली तरी उत्साह मात्र कायम होता. यावेळी गणेश भक्तांनी कोरोना नियमांचं पालन करत उत्साहात गणरायाच्या मूर्तीची घरी आणि मंडपात प्रतिष्ठापना केली. (devendra fadnavis targets Shiv Sena over temples reopening)

संबंधित बातम्या:

पवारांनी केलेलं वर्णन काँग्रेसला चपखल बसतं, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला टोला

Ganesh Chaturthi 2021 | ना ढोलताशांचा दणदणाट, ना गुलालांची उधळण; कोरोना नियमांचं पालन करत गणरायाचं उत्साहात आगमन

Ganesh Chaturthi 2021 | गणेश चतुर्थी आज, जाणून घ्या गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त

(devendra fadnavis targets Shiv Sena over temples reopening)

Follow Us
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!