AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi 2021 | ना ढोलताशांचा दणदणाट, ना गुलालांची उधळण; कोरोना नियमांचं पालन करत गणरायाचं उत्साहात आगमन

ना ढोलताशांचा दणदणाट... ना गुलालांची उधळण... ना भव्यदिव्य मिरवणुका... मात्र, तरीही गणपती बाप्पा मोरया... मोरया रे बाप्पा मोरया रे... अशा घोषणा देत विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन झालं. (Ganeshotsav 2021: Ganpati bappa arrives in thane, mumbai)

Ganesh Chaturthi 2021 | ना ढोलताशांचा दणदणाट, ना गुलालांची उधळण; कोरोना नियमांचं पालन करत गणरायाचं उत्साहात आगमन
Ganeshotsav
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 11:03 AM
Share

ठाणे: ना ढोलताशांचा दणदणाट… ना गुलालांची उधळण… ना भव्यदिव्य मिरवणुका… मात्र, तरीही गणपती बाप्पा मोरया… मोरया रे बाप्पा मोरया रे… अशा घोषणा देत विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन झालं. राज्यभर रस्त्यांवरून गणेश मूर्त्या घेऊन जाताना गणेश भक्त दिसत होते. मात्र, रस्त्यावर नेहमीसारखी गर्दी नसली तरी उत्साह मात्र कायम होता. यावेळी गणेश भक्तांनी कोरोना नियमांचं पालन करत उत्साहात गणरायाच्या मूर्तीची घरी आणि मंडपात प्रतिष्ठापना केली. (Ganeshotsav 2021: Ganpati bappa arrives in thane, mumbai)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी उत्सवावर कडक निर्बंध होते. मात्र यंदा कोरोनाच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नियम शिथिल करत उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे. याचाच एक भाग म्हणून भक्तही राज्य सरकारच्या नियमांचे पालन करताना दिसत आहे. ठाण्यातील कोपरी परिसरातील शांती नगर या ठिकाणी सार्वजनिक नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने कोरोनाचे नियम पाळत आणि नागरिकांना संदेश देणारे फलक हातात घेऊन गणरायाचे आगमन झाले. महिलांनी गणरायाचे टाळाच्या गजरात स्वागत केले. मुलांनी बाप्पाचा जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. करोनाचे नियम पाळून गणपती उत्सव साजरा करा, तोंडाला मास्क लावा, कोरोना टाळा, सुरक्षित अंतर ठेवा असे अनेक संदेश देणारे फलक हातात घेऊन आगळ्या वेगळ्या स्वरूपाने गणरायाचे आगमन करण्यात आले. तसेच लवकरात लवकर कोरोना जावो अशी प्रार्थना बप्पाकडे या सर्व महिलांन कडून करण्यात आली.

चार हजार पोलीस तैनात

ठाण्यात बाप्पाच्या स्वागतासाठी 4 हजार पोलिस तैनात ठेवण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवातील शांततेसाठी 200 पेक्षा अधिक उपद्रवी व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ठाण्यात एक लाख 41 हजार 20 घरगुती तर 1 हजार 58 सार्वजनिक बाप्पांचे ठाण्यात विराजमान होणार आहे.

गणेशमूर्तीची फ्री होम डिलीव्हरी

यंदा गणेशोत्सवामध्ये घरगुती गणरायाची प्रतिष्ठापना करणाऱ्यांना घरपोच गणेशमूर्ती देण्याचा निर्णय श्री साई मोरया कला केंद्राकडून घेण्यात आला आहे. या अनोख्या उपक्रमाचे गणेश भक्तांकडून स्वागत करण्यात आले आहे .पनवेल, नवी मुंबई परिसरातील बरेच विक्रेते आणि कला केंद्रांकडून बाप्पांची मूर्ती घरपोच देण्यात येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर कोरोनाची तिसरा लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून गणेशोत्सवांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

तेजूकायाच्या गणपतीची प्रतिष्ठापना

राज्यसरकारने आवाहन केल्याप्रमाणे मुंबईत आज सकाळपासून अगदी साध्या पद्धतीने सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापणा सुरू आहे. यंदाही बापांच्या मूर्त्यांची उंची कमी असल्याने 4 फुटांच्या आत असणाऱ्या मूर्त्या सार्वजनिक मंडळाने बसवल्या आहेत. तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 55 वर्ष आहे. यंदाही 4 फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठपणा करण्यात आलीय आणि मंडपात भाविकांना दर्शनासाठी येण्यास मनाई करण्यात आलीय. मात्र ऑनलाईन दर्शनाची सोय मंडळाकडून करण्यात आलीय. (Ganeshotsav 2021: Ganpati bappa arrives in thane, mumbai)

संबंधित बातम्या:

Ganesh Chaturthi 2021 | गणेश चतुर्थी आज, जाणून घ्या गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2021 | महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचं आज आगमन, भाविकांमध्ये मोठा उत्साह

Ganesh Chaturthi 2021 Live Updates | लाडक्या बाप्पाचं आगमन, राज्यभरात गणेशोत्सवाची धूम

(Ganeshotsav 2021: Ganpati bappa arrives in thane, mumbai)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.