पवारांनी केलेलं वर्णन काँग्रेसला चपखल बसतं, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला टोला

पवारांच्या टोल्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलंय. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांनी केलेल्या काँग्रेसच्या वर्णनावरुन काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. पवारांनी केलेलं वर्णन काँग्रेसला चपखल बसतं, असं फडणवीस म्हणाले.

पवारांनी केलेलं वर्णन काँग्रेसला चपखल बसतं, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला टोला
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते


मुंबई : आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातील जमीनदारांसारखी झाली आहे. त्यांच्याकडील जमीन गेल्या आता फक्त हवेली उरली आहे, असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं. पवारांच्या या टोल्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलंय. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांनी केलेल्या काँग्रेसच्या वर्णनावरुन काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. पवारांनी केलेलं वर्णन काँग्रेसला चपखल बसतं, असं फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis criticizes Congress After Sharad Pawar describes Congress as a landlord in Uttar Pradesh)

“काँग्रेसचं वर्णन हे शरद पवार यांनी केलेल्या वर्णनापेक्षा वेगळं असूच शकत नाही. कारण काँग्रेस आज जुन्या पुण्याईवर चालली आहे. आमच्या वऱ्हाडात असं म्हणतात की मालगुजारी तर गेली आता उरलेल्या मालावर गुजराण सुरु आहे. तशा प्रकारचंच वर्णन पवारसाहेबहांनी केलं आहे आणि ते काँग्रेसला चपखल लागू पडतं”, असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

शरद पवारांनी नेमकं काय उदाहरण दिलं?

‘उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या हजारो एकर जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. आता त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकदही त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनी आता 15-20 एकरवर आल्या आहेत. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही, असं सांगत पवारांनी काँग्रेसची आजची स्थिती विषद केली.

नाना पटोलेंचं पवारांना प्रत्युत्तर

काँग्रेसनं अनेक लोकांना जमीन राखायला दिली. ज्यांना राखण्यासाठी जमीन दिली त्यांनीच डाका मारला. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असं शरद पवार यांना म्हणायचं असेल, असा टोला पटोले यांनी लगावला आहे. दुसऱ्या पक्षाबद्दल प्रतिक्रिया द्यायला नको. असं म्हणत पटोले यांनी अप्रत्यक्षपणे पवारांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 2024 ला काँग्रेसचाच पंतप्रधान बनणार. कुणाला काय बोलायचं याचं लोकशाहीत स्वातंत्र्य आहे, असंही पटोले टीव्ही 9 शी बोलताना म्हणाले.

‘ज्यांना शक्ती दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला’

काँग्रेस जमीनदारांचा पक्ष नाही. काँग्रेसनं जमीनदारी केली नाही. काँग्रेसनं ज्यांना शक्ती दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला. सामान्य जनता काँग्रेससोबत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तो आम्ही चालू देणार नाही. 2024 मध्ये काँग्रेसच देशाचं नेतृत्व करेल, असा विश्वासही पटोले यांनी यावेळी व्यक्त केलाय. शरद पवार यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली नाही. जमिनदारांचं उदाहरण दिलंय, असंही पटोले म्हणाले.

इतर बातम्या :

गोव्यात गेलो तरी ‘मी पुन्हा येईन’; व्यंगचित्राच्या माध्यमातून फडणवीसांना राष्ट्रवादीचा टोला

माध्यमांवर दबाव तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, फडणवीसांचा आरोप; संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी

Devendra Fadnavis criticizes Congress After Sharad Pawar describes Congress as a landlord in Uttar Pradesh

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI