माध्यमांवर दबाव तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, फडणवीसांचा आरोप; संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी

वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी एखाद्या गुंडाप्रमाणे अरेरावी केली. अधिकृत पास असतानाही निकम यांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत परिसरातून बाहेर जाण्यास सांगितलं. मीडियाकर्मींनी निकम यांना प्रेमाने, समजुतीने बोलण्यासं सांगितलं, त्यावेळी त्यांचा पारा आणखी चढल्याचं पाहायला मिळालं. या प्रकारावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.

माध्यमांवर दबाव तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, फडणवीसांचा आरोप; संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 4:05 PM

नागपूर : लालबागच्या राज्याची प्रतिष्ठापना आज करण्यात आली. तत्त्पुर्वी परिसरातील दुकानं पोलिसांनी बंद केल्यामुळं काही काळ तणावाचं वातावरण होतं. त्यानंतर मुंबई पोलिस कायदा सुव्यस्था सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाशी चर्चा केली आणि मध्यस्थीचा मार्ग काढला. त्यानंतर दुकानं सुरु करण्यात आली. मात्र, त्यानंतर वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी एखाद्या गुंडाप्रमाणे अरेरावी केली. अधिकृत पास असतानाही निकम यांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत परिसरातून बाहेर जाण्यास सांगितलं. मीडियाकर्मींनी निकम यांना प्रेमाने, समजुतीने बोलण्यासं सांगितलं, त्यावेळी त्यांचा पारा आणखी चढल्याचं पाहायला मिळालं. या प्रकारावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. (Devendra Fadnavis protests against police arrears on media)

फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर घणाघात

‘माध्यमं आपलं काम करत होते. जास्त गर्दी नव्हती. त्यांच्याकडे पासेस होते. अशावेळी त्यांना मारहाण, धक्काबुक्की करणं योग्य नाही. माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे. मागील दोन वर्षांपासून असे प्रकार सुरु आहेत. इतकी दंडुकेशाही योग्य नाही. याची दखल सरकारने घेतली पाहिजे. कारवाई तर झालीच पाहिजे पण अशाप्रकारे दंडुकेशाहीच्या जोरावर जर आपण कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असू तर ते काही योग्य नाही. अतिशय चुकीचं हे वर्तन आहे आणि याबाबत कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

त्याचबरोबर ‘मागील दोन वर्षांपासून आपण पाहत आहोत. माध्यमांवर एकप्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. कधी गुन्हे दाखल करायचे, कधी कुणाला अटक करायची, कुणावर अन्य प्रकारच्या कारवाया करायच्या, एकप्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. माध्यमांवर प्रचंड दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे’, असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केलाय.

लालबागच्या दरबारात नेमकं काय घडलं?

लालबागचा राजा गणपतीचं कव्हरेज करण्यासाठी पत्रकार जमले होते. या पत्रकारांकडे अधिकृत प्रवेशाचे पास होते. चार दिवसापूर्वी सर्वांना हे पास देण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी पास दाखवून प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावेळी PI संजय निकम यांनी अरेरावी करण्यास सुरुवात केली. प्रवेश देणार नाही, इथून दोन मिनिटात बाहेर पडा, असं म्हणत संजय निकम यांनी थेट पत्रकारांशी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पत्रकारांनी संजय निकम यांनी समजुतीने घेण्यास सांगितलं. तरीही संजय निकम यांनी धक्काबुक्की चालूच ठेवली. त्यावेळी संजय निकम यांना हात लावू नका, धक्काबुक्की करु नका असं सांगितलं. त्यावेळी संजय निकम म्हणाले, हात काय, पाय सुद्धा लावू शकतो, असं म्हणत पत्रकाराला काठी दाखवली.

‘पोलिसांची वागणूक चुकीची’

लालबागच्या कव्हरेजसाठी आम्ही सगळ्यानी नियमानुसार पास काढले होते. पण पास असूनही सकाळपासून पोलिसांनी एन्ट्री दिली नाही. तरीही आम्ही अधिकाऱ्यांशी विनंती करून आतमध्ये जाण्याच्या प्रयत्न करत होतो. पण पोलीस निरीक्षक संजय निकम आमच्यावर अरेरावी करायला लागले. त्यांनी धक्के देऊन बाहेर काढायला सुरुवात केली. सकाळपासून आम्ही गेटवर उभे आहोत. त्यांचं बोलणं योग्य नाही. आम्ही फक्त त्यांना एवढंच म्हटलं की, सर आम्ही तुमच्याशी प्रेमाने बोलतोय तुम्हीही आमच्याशी प्रेमाने बोला, तरीही अशा प्रकारची वागणूक आम्हाला देण्यात अशी अशी प्रतिक्रिया पत्रकार अभिषेक मुठाळ यांनी दिलीय.

इतर बातम्या :

Photo : राजकीय गणेशोत्सव; मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या घरी गणरायाचं आगमन

माजी खासदार संजीव नाईक रावसाहेब दानवेंच्या भेटीला, रेल्वेपासून ते धरणापर्यंतच्या विविध विषयांवर चर्चा

Devendra Fadnavis protests against police arrears on media

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.