400 किमी पायी प्रवास करून शिवसैनिक निघाले “मातोश्रीवर”; पक्षप्रमुखांकडे मांडणार विविध समस्या आणि प्रश्न

| Updated on: Sep 19, 2021 | 7:27 PM

शिवसैनिकांचा 400 किलोमीटर पायी यात्रा गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील राजूशेठ जैस्वाल यांच्यासह रामनाथ लक्ष्मण मोरे, ज्ञानेश्वर विनायक अदमाने, नवनाथ शिवाजी शेवाळे या शिवसैनिकांनी सावखेडा गंगापूर ते मुंबई मातोश्री असा 400 किलोमीटर पायी प्रवास सुरू केला आहे.

400 किमी पायी प्रवास करून शिवसैनिक निघाले मातोश्रीवर; पक्षप्रमुखांकडे मांडणार विविध समस्या आणि प्रश्न
400 किमी पायी प्रवास करून शिवसैनिक निघाले "मातोश्रीवर"
Follow us on

इगतपुरी / शैलेश पुरोहित : सर्वसामान्य शिवसैनिकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि इतर मागण्या घेऊन गंगापूर तालुक्यातील शिवसैनिकांनी 400 किलोमीटरचा पायी प्रवास सुरू केला आहे. या प्रवासानंतर हे शिवसैनिक मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. शिवसैनिकांचा 400 किलोमीटर पायी यात्रा गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील राजूशेठ जैस्वाल यांच्यासह रामनाथ लक्ष्मण मोरे, ज्ञानेश्वर विनायक अदमाने, नवनाथ शिवाजी शेवाळे या शिवसैनिकांनी सावखेडा गंगापूर ते मुंबई मातोश्री असा 400 किलोमीटर पायी प्रवास सुरू केला आहे. आज हे शिवसैनिक इगतपुरीत दाखल झाले. इगतपुरीतील शिवसैनिक भूषण जाधव व मनसैनिक राज जावरे यांनी मित्र मंडळींसह यांचे स्वागत करत, पुढील प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. (Shiv Sainiks set off on foot 400 km “Matoshri”; Various issues will be presented to the party leaders)

पक्षश्रेष्ठींकडे समस्या मांडणार

सर्वसामान्यांच्या अडचणी मांडण्याकरता पायी प्रवास करून मुख्यमंत्र्यांकडे सर्वसामान्य शिवसैनिकांचे प्रश्न मांडणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेत जी गटबाजी चालू आहे, ती थांबवावी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, पिकविम्याची रक्कम त्वरित मिळावी, सोयाबीनला हमीभाव मिळावा तसेच आपल्या मतदार संघात दुसऱ्या पक्षाचा आमदार असल्याने पक्षाच्या लोकांची कुठलीही कामे होत नाही, सामान्य शिवसैनिकांना त्यांच्या प्रॉपर्टीवर कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे विविध प्रश्न घेवून हे शिवसैनिक मुंबई मातोश्री येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी पायी प्रवासाला निघाले आहेत.

पक्ष संघटना आणि विकास कामांवर राऊतांची चर्चा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील सांगण्यास संजय राऊत यांनी नकार दिला. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. पण ही आतली चर्चा आतमध्ये. बाहेर का सांगू?, असा सवाल करत संजय राऊत यांनी त्यावर अधिक बोलण्यास नकार दिला. गणेशोत्सव सुरू आहे. उद्या विसर्जन होणार आहे. त्यामुळे गणपतीचं दर्शन घेतलं. थोड्यावेळ गप्पा मारल्या. गणपती सुद्धा राजकारण्यांचा गुरू आहे. राजकारण्यांनी गणपतीकडून अनेक गोष्टी शिकव्यात. मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली, काय बोललो… या चर्चा आतमध्ये. त्या बाहेर कशाला सांगायच्या?, असं राऊत म्हणाले. (Shiv Sainiks set off on foot 400 km “Matoshri”; Various issues will be presented to the party leaders)

इतर बातम्या

महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह लिखाण, ‘लखोबा लोखंडे’ पुणे सायबर पोलिसांच्या कचाट्यात

आप, बसपा-अकाली दलाला रोखण्यासाठी काँग्रेसची खेळी?; दलित व्होटबँक खेचणार?; कोण आहेत चरणजीतसिंग चन्नी?