महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह लिखाण, ‘लखोबा लोखंडे’ पुणे सायबर पोलिसांच्या कचाट्यात

गेल्या अनेक दिवसांपासून लखोबा लोखंडे या फेसबुक पेजवरून सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली होती.

महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह लिखाण, 'लखोबा लोखंडे' पुणे सायबर पोलिसांच्या कचाट्यात

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून लखोबा लोखंडे या फेसबुक पेजवरून सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली होती. तसेच ‘मला पकडून दाखवल्यास 100 कोटी रुपयांचे बक्षीस देणार’ असे चॅलेंज देणाऱ्या या पेजचा चालक अभिजीत लिमये याच्या पुणे सायबर क्राईमने मुसक्या आवळल्या. सांगली येथून काल (18 सप्टेंबर) त्याला ताब्यात घेण्यात आली. (Offensive writing against Mahavikas Aghadi leaders, Lakhoba Lokhande facebook page admin Abhijeet limaye Arrested)

लिमये याला आज पुणे येथे न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते. यावेळी राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी या अभिजित लिमयेच्या तोंडाला काळे फासत त्याच्याकडून पुन्हा असे करणार नाही, असं वदवून घेतले. सोशल मीडियावर व्यक्त होताना प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु मोठ्या कष्टाने ज्या नेत्यांनी आपली कारकीर्द घडवली त्यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अशाच प्रकारे समाचार घेणार, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

इतर बातम्या

लग्नाहून परतताना तरुणीवर सामूहिक बलात्कार, लिफ्टच्या बहाण्याने तिघांकडून अत्याचार

दोस्त दोस्त ना रहा, मित्रच बनला शत्रू, उल्हासनगरात हत्येची दुसरी घटना, कारण फक्त…

सहा वर्षांच्या पुतणीवर वारंवार बलात्कार, ठाण्यात नराधम काकाला अटक

(Offensive writing against Mahavikas Aghadi leaders, Lakhoba Lokhande facebook page admin Abhijeet limaye Arrested)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI