AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहा वर्षांच्या पुतणीवर वारंवार बलात्कार, ठाण्यात नराधम काकाला अटक

खेळण्याच्या बहाण्याने आरोपी काका तिला नेहमी आपल्या घरी घेऊन जायचा. मात्र तो तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करणा्यात आला आहे

सहा वर्षांच्या पुतणीवर वारंवार बलात्कार, ठाण्यात नराधम काकाला अटक
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 1:51 PM
Share

उल्हासनगर : सहा वर्षांच्या पुतणीवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातून नराधम काकाला पोलिसांनी अटक केली आहे. 42 वर्षीय आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आल्याची माहिती उल्हासनगरातील हिल लाईन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

आरोपी हा त्याच्या पुतणीच्या शेजारीच राहत होता. खेळण्याच्या बहाण्याने आरोपी काका तिला नेहमी आपल्या घरी घेऊन जायचा. मात्र तो तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या मोठ्या भावाने आरोपीला तिच्यासोबत लैंगिक कृत्य करताना पाहिले. त्याने ही बाब त्याच्या पालकांना सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून आरोपी काकाविरोधात तक्रार दाखल केली

आरोपी काकाला बेड्या

मुलीची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली, ज्यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याची पुष्टी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर, आरोपीला अटक करण्यात आली आणि कलम 376 (बलात्कार) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मुंबईत 11 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, वॉचमनला अटक

दुसरीकडे, गृहनिर्माण सोसायटीतील एका 11 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका सुरक्षा रक्षकाला मुंबईत अटक करण्यात आली आहे. कांजूरमार्ग येथील संबंधित सोसायटीत आरोपी वॉचमन गेल्या महिनाभरापासून काम करत होता. पीडितेने शुक्रवारी आई-वडिलांकडे आपल्यावरील अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. कांजूरमार्ग येथील हनुमान गल्ली येथे राहणारा 29 वर्षीय आरोपी 15 ऑगस्टपासून मुलीचा छळ करत होता, असे पोलिसांनी सांगितले.

साकीनाका बलात्कार प्रकरण

दरम्यान, मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात 9 सप्टेंबरच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली होती. मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं होतं. मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

साकीनाका खैरानी रोड येथे मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार कंट्रोल रुमला प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

तीन दिवस मृत्यूशी झुंज

या घटनेनंतर तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तात्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

हेही वाचा :

हातोड्याच्या धाकाने स्कायवॉकवरुन मित्रांना पळवलं, शिर्डीहून आलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

वर्षभर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या घरात शिरुन कुटुंबियांनाही मारहाण, पुण्यातल्या नण्या वाघमारे गँगचं भयानक कृत्य

तरुणीसोबत आधी दोस्ती केली, नंतर नोकरीचं आमिष, कारमध्येच सामूहिक बलात्कार, पीडितेला हायवेवर फेकून दिलं

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.