नाशिकमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य, ठाकरे सेनेचा पालिकेवर ‘महामोर्चा’

नाशिक शहरातील रस्त्यांवरील खोदकाम आणि खड्‌डे हा विषय संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. आज ठाकरे गटाने येथे महामोर्चा काढला आहे. या मोर्चात खासदार संजय राऊत देखील सहभागी झाली आहेत. त्यांनी थेट नाशिकच्या आयुक्त यांची तातडीने बदली करा अशी देखील मागणी केली आहे.

नाशिकमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य, ठाकरे सेनेचा पालिकेवर महामोर्चा
Nashik potholes
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 17, 2026 | 1:13 PM

पावसामुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक बळी गेले आहेत. आता नाशिकमधील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातांवरुन शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यांनी पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी राजीव गांधी भवनपर्यंत महामोर्चा काढला आहे. या भगव्या वादळात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याचे दिसत आहे. खासदार संजय राऊत देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी नाशिक शहराच्या सध्याच्या परिस्थितीला सरकारच जबाबदार असल्याचे म्हणत टीका केली. रस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाकडून केवळ बैठका नको ठोस उपाययोजना करण्याची मागणी मोर्चात सहभागी झालेल्यांनी केली आहे.

१५ हजारपेक्षा अधिक खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा

नाशिक शहरात आतापर्यंत खड्ड्यांमुळे दहा जणांचा बळी गेल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला. महापालिकेने आतापर्यंत १५ हजारपेक्षा अधिक खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा करण्यात केला आहे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मागील आठवड्‌यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर गेले होते. त्यांनी काही ठिकाणी रस्त्यांचीही पाहणी केली. तसेच महापालिका प्रशासनावर टीकास्त्र सोडले. याविषयी महापौर हिमगौरी आडके यांनी नाराजी व्यक्त केली होती. ठाकरे हे चर्चा न करताच निघून गेले, असे त्यांनी नमूद केले होते. त्यानंतर आता ठाकरेंनी हा महामोर्चा काढला आहे.

संजय राऊत यांची टीका

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, दौऱ्यात फरक आहे. याच्या आधी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येऊन गेले, त्यांनी पाहणी केली. नाशिक विद्रुप झालेले दिसतंय. याआधी कधी अशी परिस्थिती नव्हती. नाशिकचे खड्डे चेष्ठेचा विषय झाला. खड्डेमुक्त शहर नाशिकची ओळख होती. मखमलबाद परिसरात गेलो होतो. लोकांच्या डोळ्यात पाणी होतं. नाशिक मनपाने रस्त्यावर स्विमिंग पूल करून दिले. सगळ्या खड्ड्यात भाजपचे नगरसेवक बसतील. बाजूच्या खड्ड्यात मिंध्ये गटाचे बसतील. माझ्याकडे दहा जणांची नावे. त्यांचा मृत्यु झाला. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी माफी मागितली.

पुढे ते म्हणाले, मनपा आयुक्त आणि महापौर यांचा हा निर्ढावलेलं आहे. गिरीश महाजन यांना आम्ही चंपत राय म्हणतो. त्यांनी मागितली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहा गेली इथल्या खड्ड्यांनी 10 घेतली. 1 कोटी रुपये मदत द्यायला हवी. प्रत्यकेची बील दहा लाखाच्या घरात आहेत. महापालिका म्हणते आम्हाला मर्यादा आहे. ठेकेदारांच्या घरी जा, कमिशनचे पैसे आहेत ते पैसे घेऊन द्या. आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केले पाहिजे. कोर्टात जाऊन गुन्हा दाखल करा. लोकांनी त्यांना मतदान केलेलं नाही. चोरलेले मतदान आहे. शिवसेना कायम रस्त्यावर आहेत. आदित्य ठाकरे काल चाकणला होते. आम्ही लोकांसमोर हे मुद्दे आणतोय. काल मुली भेटल्या अत्यंत वाईट. नाशिकच्या आयुक्त यांची तातडीने बदली करा. त्यांच्या चेहऱ्यावर थोडीही संवेदना दिसत नाही. त्यांना रस्त्यावर फिरवा तेव्हा कळेल त्यांनाआजचा मोर्चा अभूतपूर्व राहील. ज्या भागात खड्डे आहेत, तिथं असलेले आमदार आणि नगरसेवक आहेत तिथं आंदोलन केले जाईल

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us