
मालेगावः भाऊ-बहिणीच्या (Brother And Sister) नात्याला काळिमा फासणारी घटना मनमाड शहरात घडली आहे. भाऊ नेहमी त्रास देत असल्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून बहिणीने टोकाचे पाऊल उचलत थेट लहान भावाच्या (Murder) पोटावर चाकूने वार करुन त्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली. ही घटना विवेकानंदनगर भागात मंगळवारी दुपारी घडली. संदीप गोंगे असे मृत झालेल्या भावाचे नाव आहे. ही घटना घडल्यानंतर भावाचा खून करणारी बहीण शोभा गारुडकर स्वतः पोलीस स्थानकात हजर झाली. यावेळी पोलीस स्थानकात तिने मी माझ्या भावाचा खून केल्याची कबुली दिली आहे. तिच्या जबाबनंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे.
मृत भावाकडून बहिणीला प्रचंड त्रास दिला जात होता. त्यामुळे बहिणीने हे टोकाचे पाऊल उचलले. गेल्या अनेक दिवसांपासून भावाकडून तिला त्रास दिला जात होता. गेल्या अनेक दिवसांपासून भावाला दारुचे व्यसन होते.
दारु पिऊन आल्यानंतर तो आपल्या बहिणीला शिव्या देत होता. तो नेहमीच बहिणीला शिवा देत होता. दारू पिऊन त्याने मारहाण करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याला समज देण्यात आली होती.
मात्र तो दारुच्या आहारी गेल्यामुळे तो ऐकण्याची मनस्थितीत नव्हता. बहीण भावाचे वाद टोकाला गेल्यानंतर बहिणीकडून रागाच्या भरात त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. रागाच्या भरात बहिणीकडून हे कृत्य झाल्यामुळे घटना घडल्यानंतर बहीण स्वतःहून पोलीस स्थानकात हजर होऊन तिने आपण केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून मृत व्यक्तिची बहीण माहेरी राहण्यासाठी आली होती. कोरोना काळात तिच्या लहान मुलीचा मृत्यू झाला होता. त्यामुळेही ती दुःखी होती. त्यातच या दोघा बहीण भावांची आई आजारी असल्याने तिची काळजी घेण्यासाठी म्हणून बहीण आई जवळ येऊन थांबली होती. मात्र या काळात भाऊ नेहमी बहिणीबरोबर भांडत होता. गेल्या अनेक दिवसांपासून दारू पिऊन येऊन बहीणबरोबर भांडत असल्याने बहिणीने हे टोकाचे पाऊल उचलले.