तर देशात पुन्हा गोध्रा होईल, उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा; आणखी काय म्हणाले?

| Updated on: Sep 10, 2023 | 2:49 PM

आम्ही आता देशातील सत्ताधारीच बदलणार आहोत. 2024 नंतर हे सरकार केंद्रात ठेवायचं नाही. त्यांना हरवणार म्हणजे हरवणारच. त्यासाठी तयार राहा. आतापासूनच कामाला लागा. मोठी लढाई लढायची आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

तर देशात पुन्हा गोध्रा होईल, उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा; आणखी काय म्हणाले?
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव | 10 सप्टेंबर 2023 : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकसभा जिंकण्याचा चंगच सत्ताधारी आणि विरोधकांनी बांधला आहे. या सर्व हालचाली सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. येणाऱ्या काळात देशात काय होऊ शकतं याची भीतीच उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जाहीरसभेतून ही भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या आरोपाचे अनेक अर्थही काढले जात आहेत.

उद्धव ठाकरे हे जळगावात आहेत. जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी जाहीरसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती हल्ला करताना मोठा गौप्यस्फोटही केला. राम मंदिराचं येत्या 23 जानेवारीला उद्घाटन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसाच्या दिवशीच उद्घाटन होणार आहे. मी त्याचं स्वागत केलं. पण उद्घाटनामागे एक डाव असू शकतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पुन्हा देश पेटवतील

राम मंदिराच्या उद्घाटनाला लाखो हिंदूंना बोलवायचं. बस, रेल्वे आणि ट्रकने बोलवायचं. आणि परतताना एखादा गोध्रा घडवायचा असं होऊ शकतं. हल्ला घडवू शकतात. कोणत्या तरी वस्तीत बस जाळायची. दगडफेक करायची. माणसं मारतील, पुन्हा देश पेटवतील. घरांच्या होळ्या पेटतील. आणि त्यावर हे आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतील. हे डावपेच त्यांचे होतील, असं सांगतनाच अशी भीती टीएमसीच्या खासदारानेही वर्तवल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

सर्व आमचंच आहे

भाजपकडून इंडिया ऐवजी भारत शब्द वापरण्यास सुरुवात झाली आहे. त्यावरही त्यांनी टीका केली. हे घाबरले आहेत. त्यांना वाटलं समोर कोणीच नाही. पण जनताच त्यांच्यासाठी आव्हान झाली आहे. आम्ही इंडिया नाव घेतल्यानंही त्यांना खाज सुटली आहे. पक्ष फोडाफोडी सुरू आहे. आता आग्यामोहळ उठलं आहे. खाज परवडेल पण दंश परवडणार नाही. इंडियाचं भारत केलं. एवढं घाबरले आहेत. जुडेगा भारत आणि जितेगा इंडिया असं आम्ही म्हटलंय, आम्ही भारत म्हणू,. इंडिया म्हणू आणि हिंदुस्थानही म्हणून. सर्व आमचंच आहे. आता त्यांनी प्रेसिडेंट ऑफ भारत, प्राईम मिनिस्टर ऑफ भारत, असं सुरू केलं. मला वाटलं देशाला स्वत:चं नाव देतात की काय? असा चिमटाही त्यांनी काढला.