नाशिकमध्ये अनोखी हेल्मेट सक्ती, नियम मोडल्यास दोन तासांच्या समुपदेशनाचा डोस!

| Updated on: Sep 09, 2021 | 5:13 PM

नाशिकमध्ये (Nashik) पोलिस आयुक्त (Nashik Police) दीपक पांडेय यांनी पुढाकार घेत गुरुवारपासून (9 सप्टेंबर) एक अनोखी हेल्मेट सक्ती (helmet compulsory) मोहीम सुरू केलीय. त्यानुसार आता नियम मोडल्यास दुचाकीस्वाराला दंडाची पावती नव्हे, तर चक्क दोन तास समुपदेनाचा डोस मिळणार आहे.

नाशिकमध्ये अनोखी हेल्मेट सक्ती, नियम मोडल्यास दोन तासांच्या समुपदेशनाचा डोस!
नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, पोलिसच या मोहिमेला हरताळ फासत आहेत.
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) पोलिस आयुक्त (Nashik Police) दीपक पांडेय यांनी पुढाकार घेत गुरुवारपासून (9 सप्टेंबर) एक अनोखी हेल्मेट सक्ती (helmet compulsory) मोहीम सुरू केलीय. त्यानुसार आता नियम मोडल्यास दुचाकीस्वाराला दंडाची पावती नव्हे, तर चक्क दोन तास समुपदेनाचा डोस मिळणार आहे. (Unique helmet compulsory in Nashik, two hours counseling if rules are broken)

नाशिकमध्ये दुचाकीस्वारांचे अपघात सत्र थांबताना दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल धोरण सुरू केले. मात्र, हेल्मेटधारकांनी या मोहिमेलाही फाटा दिला. फक्त पेट्रोल घेण्यापुरते पेट्रोल पंपावरच हेल्मेट घालणे सुरू केले आहे. हे चित्र पाहता पोलिस आयुक्तांनी गुरुवारपासून अनोखी हेल्मेट सक्ती सुरू केली आहे. त्यानुसार या मोहिमेत आता हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना लगेच दंडाची पावती नाही, तर दोन तासांच्या समुपदेशनाचा डोस मिळणार आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनधारकाला पोलिस ताब्यात घेतील. त्यांना केंद्रावर नेत त्यांचे दोन तासांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. हे समुपदेशन फलदायी ठरले, असे पोलिसांना वाटले तर त्यांना एक प्रमाण पत्र देऊन सोडण्यात येणार आहे.

इतर वेळी पाचशे रुपयांचा दंड

विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यास पाचशे रुपये, ट्रिपल सीट प्रवास करण्यास दोनशे रुपये, सिग्नल तोडणाऱ्यास दोनशे रुपये, राँगसाइड वाहन चालवणाऱ्यास पोलिस हजार रुपयांचा दंड आकारतात. मात्र, अनेक नागरिक दंड भरण्यास टाळाटाळ करतात. दंड ठोठावला तरी पोलिसांशी हुज्जत घालतात. तर अनेक ठिकाणी पोलिसच तोडपाणी करून वाहनधारकाला सोडून देतात.

नियमांचा उडतो फज्जा

नाशिकमध्ये वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. मग तो चारचाकी वाहनधारक असो की, दुचाकी. सर्रासपणे राँगसाइड प्रवास करणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेट न घालणे, वेगमर्यादेचे उल्लंघन, सिग्नलचे नियम न पाळणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या दुचाकी अपघातांनी शहर हादरून गेले आहे. त्यामुळेच पुढाकार घेत पोलिस आयुक्तांनी ही नवी समुपदेशनाचा डोस देणारी हेल्मट सक्ती सुरू केली आहे. (Unique helmet compulsory in Nashik, two hours counseling if rules are broken)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये महिनाभरात 9 दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू, गुरुवारपासून कडक हेल्मेट सक्ती

नाशिकमध्ये 3 लाख 96 हजार 759 रुग्ण कोरोनामुक्त, 928 जणांवर उपचार सुरू

नाशिकच्या उद्योगांचे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले वीजदर अनुदान अखेर सुरू