‘जरांगे-पाटलांचा हिरा, मराठ्यांसाठी लढतो सारा’, शेतात काम करणाऱ्या महिलेचं गाणं
शेतात काम करणाऱ्या महिलेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ही महिला शेतात कांदा लागवड करताना मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ गाणं गाताना दिसत आहे. ही महिला आपल्या गाण्यातून मनोज जरांगे यांचं कौतुक करत आहे.
उमेश पारीक, येवला (नाशिक) | 25 नोव्हेंबर 2023 : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील सध्या राज्यभरात सभा घेत आहेत. त्यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी त्यांची मागणी आहे. पण त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात तर वाकयुद्धच रंगलं आहे. अशा परिस्थितीत भुजबळांच्या मतदारसंघातील एका महिलेचा जरांगे पाटील यांचं कौतुक करणारी कविता समोर आली आहे.
येवला तालुक्यातील पारेगाव येथे एका शेतात कांदा लागवडी दरम्यान एक शेतमजूर महिला मराठा आरक्षणाची मागणी करणारं गाणं गाते. गंगूबाई पाठे असं या शेतमजूर महिलेचं नाव आहे. गंगूबाई या मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर गाणं म्हणाल्या आहेत. त्यांचा कविता बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या कवितेतून त्यांनी मनोज जरांगे यांचं कौतुक केलंय.
गंगूबाई यांची कविचा
जरांगे-पाटलांचा हिरा, मराठ्यांसाठी लढतो सारा, नाही कोणा नेत्याचा घेतला सहारा, उपोषणाला बसला वाघ, अन्न पाण्याचा केला त्याग, या माऊलीच्या पोटी जन्म घेतला खरा, असं हे कुठवर चालणार, सरकार आरक्षण द्या ना लवकर, पद मिळवले आमच्या जीवावर, सावलीत बसून तुमचा नियम, उन्हात गळतो आमचा घाम