Malegaon : मालेगाव महानगरपालिका प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार, उद्यानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा

| Updated on: May 20, 2022 | 5:41 PM

कोट्यावधी रुपयांचा आर्थिक बजेट असलेल्या मालेगाव महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभार आहे. त्यामुळे अमृत योजनेच्या कोट्यवधी रुपयांचा निधीतून उभारण्यात आलेल्या या उद्यानांची आज बकाल अवस्था झाली आहे.

Malegaon : मालेगाव महानगरपालिका प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार, उद्यानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा
उद्यानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक : कामगार वस्तीचे शहर असलेल्या मालेगाव शहराच्या (Malegaon City) सुंदरतेत भर पडावी यासाठी शासनाच्या अमृत योजनेतून तब्बल 5 कोटी रुपयांच्या निधीतून उद्यान विकसित करण्यात आले होते. यामुळे शहराच्या सुंदरतेत काही प्रमाणात भर पडली होती. या उद्यानात नागरिकांची वर्दळ देखील वाढली होती. मनपाच्या (Malegaon Municipal Corporation)दुर्लक्षामुळे आताच्या परिस्थितीत उद्यानांची (Garden) मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रोपे आणि लावलेली झाडे करपली असून उद्याने अखेरची घटका मोजत आहेत. मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे कोटींचा निधी वाया गेल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. सध्या तिथल्या उद्यानाची अवस्था एखाद्या क्रिकेटच्या मैदानासारखी झाली आहे, त्यामुळे याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मालेगाव महानगरपालिका प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार

कोट्यावधी रुपयांचा आर्थिक बजेट असलेल्या मालेगाव महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभार आहे. त्यामुळे अमृत योजनेच्या कोट्यवधी रुपयांचा निधीतून उभारण्यात आलेल्या या उद्यानांची आज बकाल अवस्था झाली आहे. ही सर्व उद्याने मालेगाव शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात विकसित करण्यात आली होती. गाजावाजा करून तयार करण्यात आलेल्या या उद्यानात लावण्यात आलेली रोपे चांगली वाढली होती. याठिकाणी लहान बालकांसह जेष्ठ नागरिक देखील विरंगुळासाठी गर्दी करीत होते. परंतु मनपा आणि उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे आज ते कोट्यवधीचे उद्याने बकाल झालीत. उद्यान विभागाने देखभाल करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे सर्व उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे. याठिकाणी लावण्यात आलेली रोपे करपली आहेत. जी रोपे मोठी झाली होती ती वाळल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सरपणासाठी तोडून नेली आहेत.

शहराला पुन्हा विद्रुपीकरण आले

मात्र यामुळे शहराला पुन्हा विद्रुपीकरण आले आहे. उद्यानासाठी खर्च केलेला कोट्यवधी रुपयांचा निधीचा चुराडा झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हे सुद्धा वाचा

सध्याची मालेगाव शहरातील उद्यानाची अवस्था एखाद्या क्रिकेटच्या मैदानासारखी झाली आहे. उद्यानाची देखभाल न केल्याने अशी अवस्था झाली आहे.