“जर चुकीचं ऑपरेशन झालं तर पेशंट अडचणीत आणि डॉक्टर…;” मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्याचा खोचक टोला

| Updated on: Mar 29, 2023 | 6:43 PM

हा दवाखाना भाजपचा आहे त्यामुळे त्या डॉक्टरला ते किती वेळ ठेवायचं, किती महत्व द्यायचं हेदेखील येणाऱ्या काळात पाहावं लागले असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

जर चुकीचं ऑपरेशन झालं तर पेशंट अडचणीत आणि डॉक्टर...; मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्याचा खोचक टोला
Follow us on

अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल नवी मुंबईमध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डी.लीट पदवी बहाल करण्यात आली. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीदान कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. कार्यक्रमप्रसंगी ते म्हणाले की, मी याआधीच डॉक्टर झालोय. छोटो मोठी ऑपरेशन करतच असतो अशी जोरदार टोलेबाजी कार्यक्रमात त्यांनी केली होती. त्यानंतर विरोधकांकडून डीलीट पदवी बहाल झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही करण्यात आले. मात्र त्याच त्यांच्यावर खोचकपण टीकाही करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मी याआधीच डॉक्टर झालोय या त्यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डीलीट पदवी प्रदान करण्यात आल्यानंतर या त्यांच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. त्यावेळी त्यांनी मी याआधीच डॉक्टर झालोय असं त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी समाचार त्यांच्या त्या वक्तव्याची खिल्लीही त्यांनी उडवली.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री यांच्या डिलीट पदवीवरून त्यांच्यावर खोचक टीका करण्यात आली आहे.

तर त्याचवेळी एकनात शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सावरकर समर्थनार्त सन्मान यात्रेवरूनही त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावरदेखील त्यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिलीट पदवी देत असताना याबाबत एकनाथ शिंदे यांनी त्याचा नक्कीच अभ्यास केला असेल असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

त्यांना डीलीट पदवी मिळाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन तर केलेच पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले. तर त्यांना दिलेली पदवी त्यांच्या कार्यामुळे दिली असेल तर त्याचा मान सन्मान आपण सर्वांनीच केला पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच काही ऑपरेशन केलं तर त्याची त्या पेशंट दीर्घकाळ मदत होते मात्र चुकीचा ऑपरेशन केलं तर मात्र पेशंटसुद्धा अडचणीत येऊ शकतो आणि कदाचित डॉक्टरही अडचणीत जाऊ शकतो असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

यावेळी त्यांनी खोचकपणे टीका करताना ते म्हणाले की, हा दवाखाना भाजपचा आहे त्यामुळे त्या डॉक्टरला ते किती वेळ ठेवायचं, किती महत्व द्यायचं हेदेखील येणाऱ्या काळात पाहावं लागले असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.