मोठी बातमी : बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

| Updated on: May 18, 2023 | 12:08 PM

Supreme Court permission to Bailgada Sharyant : बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या शौकीनांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

मोठी बातमी : बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
Follow us on

नवी दिल्ली : ग्रामीण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची बातमी… बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या शौकीनांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बैलगाडा शर्यती विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.  आज याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

बारा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे. राज्य सरकारचा महाराष्ट्रातला बैलगाडा शर्यतीबद्दलचा कायदा वैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीबद्दलचा सुप्रीम मार्ग मोकळा झाला आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचं वातावरण आहे. एकमेकांना पेढे भरवत शेतकऱ्यांनी हा आनंद साजरा केला.  खासदार अमोल कोल्हे यांनीही पेढे भरवत आनंद व्यक्त केला.

अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया

शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे. सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. मी महाविकास आघाडी सरकारचे आणि आताच्या शिंदे फडणवीस सरकारचे आभार मानतो. सरकारने सकारात्मक निर्णय दिल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या, संघटनांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे हे सगळं शक्य झालं. सगळ्यांचे आभार, असं खासदार अमोल कोल्हे म्हणालेत.

भल्या-भल्या लोकांना असं वाटत होतं की, बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळणार नाही. पण मी आधीपासूनच ठाम होतो की, ही परवानगी मिळणार जरूर मिळणार आणि तसंच घडलं. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा अत्यंत आनंद देणारा आणि बैलगाडा प्रेमींमध्ये उत्साह भरणारा निर्णय आहे, असंही अमोल कोल्हे म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले…

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. बैलगाडा शर्यतीला न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. सरकारच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. सरकारने केलेला कायदा हा वैध असल्याचं न्यायलयाने म्हटलं आहे. याचा आनंद आहे. सगळ्याचं अभिनंदन, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

फडणवीसांचं कौतुक, मविआवर टीका

सर्वोच्च न्यायलयाच्या या निर्णयावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी सगळा अहवाल तयार केला. देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले पाहिजेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना कोर्टात तारीखचं लागली नाही. मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो.देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांना यश आलंय, असं गोपीचंद पडळकर म्हणालेत.