संत गाडगे बाबांची 150 वी जयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी व्हावी यासाठी पाठपुरावा करणार; यशोमती ठाकूरांची ग्वाही

| Updated on: Jul 08, 2021 | 9:01 PM

थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांची 150 वी जयंती राज्यात शासकीय यंत्रणेमार्फत साजरी करण्याचे आदेश महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतेच दिले आहेत.

संत गाडगे बाबांची 150 वी जयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी व्हावी यासाठी पाठपुरावा करणार; यशोमती ठाकूरांची ग्वाही
Yashomati Thakur
Follow us on

नवी मुंबई : थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांची 150 वी जयंती राज्यात शासकीय यंत्रणेमार्फत साजरी करण्याचे आदेश महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतेच दिले आहेत. त्यांनी नुकतेच श्री. गाडगे बाबा मिशन मुंबईच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली आहेत.(150th birth anniversary of Sant Gadge Baba should be celebrated at national level : Yashomati Thakur)

अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर ठाकूर यांनी मिशनच्या कार्यकारिणी सभेला गुरूवारी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी संत गाडगे बाबा यांची 2026 मध्ये होणारी 150 वी जयंती ष्ट्रीय पातळीवर साजरी व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्याची घोषणा केली. तसेच राज्यात शासकीय यंत्रणेमार्फत जयंती साजरी करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत.

संत गाडगे बाबांची तत्व तसेच विचार सर्वत्र पोहचविण्यासाठी सदैव तत्पर असल्याची भावना यावेळी यशोमती ठाकूर त्यांनी व्यक्त केली. संत गाडगे बाबा मिशन मुंबईच्या नवी मुंबईतील वाशी येथील प्रशासकीय कार्यालयात ही सभा पार पाडली. या सभेत मंत्री यशोमती ठाकूर यांनी संत गाडगे बाबा यांचे विचार समाजात सर्वत्र पोहोचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

अत्यंत साध्या पद्धतीने राहणाऱ्या संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीमधून समाजसेवा काय असते, वैज्ञानिक दृष्टीकोन काय असतो, अंधश्रद्धेने कसे नुकसान होते याबाबत जीवनभर जनजागृती केली. संत गाडगे बाबा यांनी केलेल्या कार्यामधून प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनीच त्यांचे विचार आत्मसात करणे आणि ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.

इतर बातम्या

कुपोषणामुळे गंभीर आजारी चिमुकली भाग्यश्री ठणठणीत, मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून प्रत्यक्ष भेटून विचारपूस

मुंडे भगिनी नाराज नाहीत तर अभिनंदनाचं एक ट्विट का नाही? फडणवीस म्हणाले, बदनाम करू नका? वाचा सविस्तर

हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडतंय, प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांच्या सुट्टीवर!

(150th birth anniversary of Sant Gadge Baba should be celebrated at national level : Yashomati Thakur)