काही बंडलबाज पोरंही जन्माला येतात, जातात तिकडेच लग्न करून सेटल होतात, अजितदादांची तुफान फटकेबाजी

| Updated on: Feb 27, 2022 | 1:45 PM

आई-वडील कष्टाने मुला-मुलींना शिकवतात. त्यांना शिक्षणासाठी बाहेरच्या गावी पाठवतात. पण मुलं तिकडे गेली का तिकडेच लग्न करतात आणि तिकडेच सेटल होतात. परत यायच नावच घेत नाही. सर्वच पिढी असं करत नाही. काही पिढी असं करते.

काही बंडलबाज पोरंही जन्माला येतात, जातात तिकडेच लग्न करून सेटल होतात, अजितदादांची तुफान फटकेबाजी
काही बंडलबाज पोरंही जन्माला येतात, जातात तिकडेच लग्न करून सेटल होतात, अजितदादांची तुफान फटकेबाजी
Follow us on

रायगड: आई-वडील कष्टाने मुला-मुलींना शिकवतात. त्यांना शिक्षणासाठी बाहेरच्या गावी पाठवतात. पण मुलं तिकडे गेली का तिकडेच लग्न करतात आणि तिकडेच सेटल होतात. परत यायच नावच घेत नाही. सर्वच पिढी असं करत नाही. काही पिढी असं करते. नाही तर म्हणाल अजित पवार नव्या पिढीवर घसरले. पण काही पिढी असे करते, असं सांगतानाच आम्हाला मुंबईत (mumbai) जास्त वेळ राहिलो तर परत बारामतील (baramati) कधी जातो असं होतं. पण काही बंडलबाज पोरंपण जन्माला येतात. एका वयस्कर वडिलांना मुलाने विमानतळावर सोडल आणि बाहेरगावी निघून गेला हे बरोबर नाही. माणुसकी विसरू नका. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचेही असतात हे कायम लक्षात ठेवा, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) म्हणाले.

रायगड जिल्ह्यातील रोह्यातील डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष सुरेश लाड आदी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी ही तुफान फटकेबाजी करतानाच तरुण पिढीला आई-वडिलांसोबत कसं वागायचं याचा सल्लाही दिला. यावेळी त्यांनी आदिती तटकरे यांचं तोंडभरून कौतुकही केलं. कोरोना काळातही आपण विकास कामाची गती कमी होऊ दिली नाही. आदिती विकास कामे करताना कुठेही कमी पडली नाही. तिने सतत रायगडसाठी कामे केली. रायगडच्या विकासासाठी प्रयत्न केला, असं अजित पवार म्हणाले.

मास्क लावा, काळजी घ्या

कोरोनाच सावट आपण पाहिल आहे. आता रुप बदलत आहे. तुमच्याकडे तर खूपच बदलेल आहे. आम्ही 3-4 जण सोडलो तर कोणीच मास्क नाही लावले. गंमतीचा भाग सोडून द्या आणि काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी केलं.

तर आनंदच होईल

मराठी भाषेला अजूनही अभिजात दर्जा मिळाला नाही. आपले प्रयत्न चालू आहेत. केंद्राने सांगितले की, आम्ही त्या प्रयत्नात आहोत. पण ते लवकर झाले तर आम्हांला आनंद होईल, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

दिल्लीश्वर कितीही कपटी असला तरी महाराष्ट्र झुकणार नाही; जयंत पाटलांचा इशारा

खुनाच्या बदल्यात खुन ! विक्रमसिंह चौहान यांना गोळ्या घातल्या, शिवसेनेचे सुदेश चौधरी यांच्यासह 8 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल

Nashik | पोस्ट व्हायरल करायची अन्…शेलारांनी सांगितले ठाकरे सरकारचे टूलकिट