
नवी मुंबईसह उपनगरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यात खारघर परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर पर्यटकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

दरम्यान रविवारी खारघर सेक्टर 5 येथील धबधब्यावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून वाहणारा ओढा दूतर्फी भरून वाहू लागला.

या ओढ्याशेजारी धबधब्यावर अडकल्या पर्यटकांना अखेर सायंकाळी सातच्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात आले.

खारघर अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास 115 पर्यटकांना बाहेर काढलं.

ओढ्यावर सीडी म्हणजेच लेडर लावून या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

या संपूर्ण पर्यटकांमध्ये 78 महिला, 38 पुरुष आणि 5 लहान मुलांचा समावेश होता.

महत्त्वाचं म्हणजे बंदीचे आदेश असताना सुद्धा आदेश झुगारून हे पर्यटक डोंगराळ भागात गेले होते.