सणासुदीच्या तोंडावर तेलाचे दर 5 ते 10 रुपयांनी वाढले; ग्राहक चिंताग्रस्त  

| Updated on: Sep 27, 2021 | 1:29 PM

कोरोना विषाणूचे थैमान कमी झाले असले तरी त्याने गेली दीड वर्षात अनेकांना बेरोजगार आणि उध्वस्त केले आहे. काहीजण आता कुठे स्थिरस्थावर होत असून दोन वेळेचे अन्न मिळवू लागले आहेत. मात्र, महागाई काही कमी होण्याचे नाव घेत नसून खाद्यतेलाने पुन्हा महागाईची वाट धरली आहे.

सणासुदीच्या तोंडावर तेलाचे दर 5 ते 10 रुपयांनी वाढले; ग्राहक चिंताग्रस्त  
Follow us on

नवी मुंबई : कोरोना विषाणूचे थैमान कमी झाले असले तरी त्याने गेली दीड वर्षात अनेकांना बेरोजगार आणि उध्वस्त केले आहे. काहीजण आता कुठे स्थिरस्थावर होत असून दोन वेळेचे अन्न मिळवू लागले आहेत. मात्र, महागाई काही कमी होण्याचे नाव घेत नसून खाद्यतेलाने पुन्हा महागाईची वाट धरली आहे.

आधीच जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडू लागल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशात तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत महागाईचे संकट समोर असतानाच तोंडावर आलेल्या दसरा दिवाळीत तेलाच्या वाढत्या किमतींची चिंता सर्वसमान्यांना लागली आहे. सणासुदीच्या दिवसांत तेल दर वाढीचा मोठा फटका सर्वसमान्यांवर बसणार आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांची यंदा दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

सणासुदीत प्रत्येक घरात तेलाचा वापर 20 ते 25 टक्क्यांनी वाढतो. शिवाय, सणासुदीला गोडधोड बनवण्यासाठी तेलाची खरेदी करावीच लागते. मात्र, मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी तेलाच्या किंमती वाढून सामान्यांची दिवाळी गोड ऐवजी कडू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोयाबीन, शेंगदाणा, मोहरी, तीळ, पाम तेल आणि सूर्यफूल अशा खाद्यतेलांचे भाव वाढले आहेत. तर सर्वच तेलाच्या दरात 5 ते 10 रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती घाऊक तेल व्यापारी महेशभाई यांनी दिली.

तेलाच्या किंमती आवाक्यात राहाव्यात म्हणून केंद्र सरकारने आयात सुरु केली. त्यामुळे 200 रुपयांच्यावर गेलेले तेलाचे दर खाली येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, आता पुन्हा दर 5 ते 10 रुपयांनी वाढले असून आणखी दर वाढीच्या भीतीने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.

किलोमागे तेलाचे दर

जून                  सप्टेंबर

शेंगदाणा    150                  155

सूर्यफूल     140                  150

सोयाबीन   130                  140

पामतेल     125                  130

संबंधित बातम्या :

गृहिणींचे बजेट कोलमडले, घरगुती सिलिंडर 25 रुपयांनी तर व्यावसायिक सिलेंडर 75 रुपयांनी महागला

श्रावण महिन्यासह पावसाळी आजारांमुळे फळांची मागणी वाढली; बाजारभाव मात्र आवाक्यात