नवी मुंबई : पावसाळी आजारांसह मलेरिया, डेंग्यू असे आजार शहरात वाढू लागले आहेत. नागरिक रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे साधा आणि घरचा आहार घेण्याला लोक प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळतंय. शिवाय भाज्या आणि फलोहाराला पसंती दिली जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी फळांना चांगलीच मागणी असते. श्रावण महिन्यात अनेक लोक शाकाहाराला पसंती देतात. शिवाय या महिन्यात रक्षाबंधन, कृष्णजन्माष्टमी असे उत्सव येतात. त्यामुळे बहुतेक लोकांना उपवास असतो. परिणामी फळांचे बाजारभाव गगनाला भिडतात. परंतू यावर्षी मात्र फळांचे बाजारभाव ग्राहकांच्या आवाक्यात राहिल्याचे पाहायला मिळत आहे. (Demand for fruits increased in Navi Mumbai APMC market)