नवी मुंबईत ICU मधील रुग्णांसाठी चांगली बातमी, 20 दिवसांच्या अतिरिक्त साठ्यासह ऑक्सिजन उपलब्ध

नवी मुंबईत ICU मधील रुग्णांसाठी चांगली बातमी, 20 दिवसांच्या अतिरिक्त साठ्यासह ऑक्सिजन उपलब्ध
नवी मुंबई महापालिका

सध्या कोरोना बाधितांची झपाट्याने वाढत असलेली संख्या आणि ऑक्सिजन कमतरता या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा कामला लागली आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 12, 2021 | 5:31 PM

नवी मुंबई : सध्या कोरोना बाधितांची झपाट्याने वाढत असलेली संख्या आणि ऑक्सिजन कमतरता या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा कामला लागली आहे. कोरोना रुग्णांना उपचारा दरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये याकरिता सतर्कता राखत आज (12 एप्रिल) महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील ऑक्सिजन स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता करुन दिली (Navi Mumbai Commissioner Abhijit Bangar avail Oxygen for Corona Patient).

इमर्जन्सीसाठी 20 दिवसांचा अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध

यावेळी आयुक्तांनी महानगरपालिकेच्या डेडिकेटेड कोव्हीड सेंटर्समध्ये ऑक्सिजन बेड्सवर उपचार घेत असलेली सध्याची रूग्णसंख्या जाणून घेतली. तसेच त्यांना दैनंदिन किती ऑक्सिजन पुरवठा लागतो याची तपशीलवार माहिती घेतली. भविष्यात संभाव्य किती ऑक्सिजन पुरवठा लागेल याची पडताळणी करत तशा प्रकारे सिलेंडर वाढीचे निर्देशही आयुक्तांनी यंत्रणेला दिले. सद्यस्थितीत महानगरपालिकेकडे आवश्यक तेवढ्या प्रमाणात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. याशिवाय इमर्जन्सीकरिता 20 दिवसांचा अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे.

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ऑक्सिजन सिलेंडरमध्ये वाढ करण्याच्या सूचना

ऑक्सिजन पुरवठ्याची दैनंदिन नोंद ठेवून त्याचे नियमित निरीक्षण करीत त्याचे निश्चित वेळेत रिफिलींग करणे अतिशय महत्वाची आहे. त्याकडे काटेकोर लक्ष ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधितांना दिले. त्याचप्रमाणे सद्यस्थितीतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ऑक्सिजन सिलेंडरमध्ये वाढ करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. सिलेंडर वाढीसोबतच लिक्विड टँक उभारण्याची कार्यवाही देखील जलद करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन आवश्यक असलेल्या बेड्ससाठी ऑक्सिजन पुरवठादार कंपन्या सुनिश्चित करणे व या कंपन्यांची यादी खासगी रुग्णालयांना उपलब्ध करून देण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.

ऑक्सिजन बेड्सची क्षमता पूर्णपणे वापरण्याबाबत नियोजन

रुग्णालयीन सुविधांमध्ये वाढ करताना ऑक्सिजन सारख्या अत्यंत गरजेच्या व महत्वाच्या गोष्टीकडेही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये असलेली ऑक्सिजन बेड्सची क्षमता पूर्णपणे वापरात येण्याच्या दृष्टीने आगामी काळातील गरज लक्षात घेऊन नियोजन केले जात आहे.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, रुग्णालयीन ऑक्सिजन व्यवस्थापन नोडल अधिकारी उपायुक्त मनोज महाले तसेच महानगरपालिकेची ऑक्सिजन बेड्स सुविधा असणाऱ्या तिन्ही डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर्सचे नोडल अधिकारी आणि ऑक्सिजन पुरवठादार उपस्थित होते.

NMMC आपत्कालीन सेवा/कोविड-19 नियंत्रण कक्ष:

1. टोल फ्री क्रमांक:- 1800222309 / 1800222310

2. Beds availability: 022 – 27567460,
http://nmmchealthfacilities.com/HospitalInfo/showhospitalist 

3. रुग्णालयांचे संपर्क क्रमांक
https://www.nmmc.gov.in/hospitals1

4. रुग्णवाहिका सेवा पुरवणाऱ्या संस्था / Ambulance service provider
https://www.nmmc.gov.in/ambulance

5. दिवस-रात्र औषधे पुरविणारे मेडिकल्स / Day and Night medicals
https://www.nmmc.gov.in/chemists

6. रक्तपेढी क्रमांक / blood Bank
https://www.nmmc.gov.in/other-important-numbers

हेही वाचा :

एपीएमसी मार्केटमध्ये कोरोना टेस्टिंगचे तीनतेरा; अँटीजेन तपासणी केंद्राचा झाला पार्किंग लॉट

Corona Update : नवी मुंबई, पनवेल पालिका क्षेत्रात बेड उपलब्ध आहेत की नाही? इथं तपासा एका क्लिकवर

नवी मुंबई, पनवेलमध्ये अत्यावश्यक सेवावगळता सर्व दुकाने बंद, व्यापारी वर्ग उतरला रस्त्यावर

व्हिडीओ पाहा :

Navi Mumbai Commissioner Abhijit Bangar avail Oxygen for Corona Patient

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें