AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update : नवी मुंबई, पनवेल पालिका क्षेत्रात बेड उपलब्ध आहेत की नाही? इथं तपासा एका क्लिकवर

व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड्सची कमतरता मोठ्या प्रमाणात भासतेय. नवी मुंबई आणि पनवेलच्या रुग्णालयातील बेड्सची स्थिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.

Corona Update : नवी मुंबई, पनवेल पालिका क्षेत्रात बेड उपलब्ध आहेत की नाही? इथं तपासा एका क्लिकवर
फोटो प्रातनिधिक
sagar joshi
sagar joshi | Updated on: Apr 10, 2021 | 11:30 PM
Share

नवी मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण निर्माण होत आहे. राज्यात लसीचा तुटवडाही मोठ्या प्रमाणात भासतोय. त्याचबरोबर रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणात वाढलाय. अशास्थितीत रुग्णालयांमधील बेड्सची संख्याही अपुरी पडू लागली आहे. त्यातही व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड्सची कमतरता मोठ्या प्रमाणात भासतेय. नवी मुंबई आणि पनवेलच्या रुग्णालयातील बेड्सची स्थिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. (Condition of beds in Navi Mumbai and Panvel hospitals)

नवी मुंबईच्या रुग्णालयांमधील बेड्सची स्थिती –

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी शहर आणि परिसरातील रुग्णालयांमध्येही बेड्सची कमतरता जाणवत आहे. सध्या नवी मुंबईत बेड्सची स्थिती काय आहे? ते जाणून घेऊया

।>> नवी मुंबईतील रुग्णालयांमध्ये ICU बेड्स एकूण 493 आहेत, त्यातील फक्त 71 बेड्स शिल्लक आहेत.

>> ऑक्सिजनची सुविधा असलेले आयसोलेशन बेड्स एकूण 1 हजार 499 आहेत. त्यातील 134 बेड्स शिल्लक आहेत.

>> ऑक्सिजनची सुविधा नसलेले एकूण बेड्स 4 हजार 31 हजार आहेत. त्यातील 2 हजार 280 बेड्स शिल्लक आहेत.

>> तर नवी मुंबईत एकूण 166 व्हेंटिलेटर्स आहेत. त्यातील 48 व्हेंटिलेटर्स सध्या शिल्लक आहेत.

नवी मुंबईच्या रुग्णालयातील बेड्सची स्थिती तुम्ही या लिंकवर पाहू शकता – https://www.nmmchealthfacilities.com/HospitalInfo/showhospitalist

पनवेलच्या रुग्णालयांमधील बेड्सची स्थिती –

पनवेलमध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसांत पनवेलमधील रुग्ण वाढ झपाट्याने होत आहे. अशावेळी पनवेलमधील बेड्सची स्थिती काय आहे? ते पाहूया

पनवेलच्या रुग्णालयांमधील बेड्सची स्थिती तुम्ही या लिंकवरही पाहू शकता – https://covidbedpanvel.in/HospitalInfo/showindex

SDH रुग्णालय –

एकूण बेड्सची संख्या 150 त्यातील फक्त 2 बेड शिल्लक आहेत. तर 2 आयसीयू बेडही शिल्लक आहेत.

सत्यम हॉस्पिटल –

एकूण बेड्सची संख्या 55 त्यातील फक्त 3 बेड शिल्लक आहेत. तर 3 आयसीयू बेडही शिल्लक आहेत. त्याचबरोबर एक व्हेंटिलेटरही शिल्लक आहे.

ऑर्चिड हॉस्पिटल –

एकूण बेड्सची क्षमता 20 आहे. त्यातील एक बेड शिल्लक नाही.

निरामय हॉस्पिटल –

एकूण बेड्सची क्षमता 56 आहे. त्यातील 9 बेड्स सध्या शिल्लक आहेत. तसंच 2 ICU, 7 ICU नसलेले तर 2 व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत.

Panacea हॉस्पिटल –

एकूण बेड्सची संख्या 50 त्यातील 6 बेड्स शिल्लक आहेत. तर 6 ICU बेड्स व्हेंटिलेटर्स आणि 10 उपलब्ध आहेत.

MGM हॉस्पिटल –

एकूण बेड्सची संख्या 150 आहे. त्यातील 92 बेड्स सध्या शिल्लक आहेत. 1 ICU, 91 ICU नसलेले बेड्स आणि 3 व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत.

Suasth हॉस्पिटल –

एकूण 51 बेड्स आहेत. त्यातील एकही बेड शिल्लक नाही. तर 7 व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत.

शुश्रृत हॉस्पिटल –

एकूण 35 बेड्स पैकी 4 बेड्स शिल्लक आहेत. 4 ICU बेड्सही उपलब्ध आहेत.

आशा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल –

एकूण 50 बेड्सपैकी एकही बेड शिल्लक नाही.

Criticare Lifeline हॉस्पिटल –

एकूण 52 बेडपैकी एकही बेड शिल्लक नाही.

Sunrise Multi specialty हॉस्पिटल –

एकूण 22 पैकी एकही बेड शिल्लक नाही.

Prachin Healthcare Multispecality हॉस्पिटल –

एकूण 40 बेडपैकी 10 बेड शिल्लक आहेत. 1 ICU, 9 ICU नसलेले बेड्स सध्या उपलब्ध आहेत.

Lifeline हॉस्पिटल –

एकूण 40 बेड्सपैकी 10 बेड्स शिल्लक आहेत. तर 1 व्हेंटिलेटरही उपलब्ध आहे.

सुखम हॉस्पिटल –

एकूण 22 बेड्सपैकी एकही बेड शिल्लक नाही.

Venkatesh हॉस्पिटल –

एकूण 40 बेड्सपैकी 24 बेड्स शिल्लक आहेत. 4 ICU बेड्स, 20 ICU नसलेले तर 1 व्हेंटिलेटर उपलब्ध आहे.

परमार हॉस्पिटल –

एकूण 20 बेडपैकी फक्त 1 बेड शिल्लक आहे. 1 ICU तर 3 व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत.

मोरे हॉस्पिटल –

एकूण 27 बेड्सपैकी 2 बेड शिल्लक आहेत. तर 2 ICU बेड्सही उपलब्ध आहेत.

मेट्रोकेअर हॉस्पिटल –

एकूण 20 बेड्सपैकी एकही बेड शिल्लक नाही. 4 ICU, 16 ICU नसलेले आणि 2 व्हेंटिलेटर शिल्लक आहेत.

मंगलदीप हॉस्पिटल –

एकूण 16 बेड्सपैकी 11 बेड शिल्लक आहेत.

दांडेकर हॉस्पिटल –

एकूण 20 बेड्सपैकी 12 बेड्स शिल्लक आहेत. त्यातील 1 ICU तर 11 ICU नसलेले बेड उलल्बध आहेत.

New Pulse हॉस्पिटल –

एकूण 20 बेड्सपैकी 5 बेड्स शिल्लक आहेत. त्यातील 1 ICU तर 4 ICU नसलेले बेड्स उपलब्ध आहेत.

Life Era हॉस्पिटल –

एकूण 21 बेड्सपैकी एकही बेड शिल्लक नाही. एक व्हेंटिलेटर उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या :

नवी मुंबई, पनवेलमध्ये अत्यावश्यक सेवावगळता सर्व दुकाने बंद, व्यापारी वर्ग उतरला रस्त्यावर

मुंबईच्या APMC मध्ये नियोजन शून्य कारभार, सभापतींच्या आदेशाला केराची टोपली, कोरोनाचा धोकाही वाढला

Condition of beds in Navi Mumbai and Panvel hospitals

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...