Panvel Weekend Lockdown Guidelines : पनवेलमध्ये गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा कारवाईला सामोरे जा!

पनवेलमध्ये विकेंड लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहेस. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.

Panvel Weekend Lockdown Guidelines : पनवेलमध्ये गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा कारवाईला सामोरे जा!

पनवेल : राज्यात आजपासून दोन दिवस विकेंड लॉकडाऊन सुरु होतोय. शनिवार आणि रविवार असा दोन दिवस हा कडक लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनची अंमलबजावणी आज रात्रीपासूनच सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शहरात विकेंड लॉकडाऊनची नियमावली जारी करण्यात आली आहे. पनवेलमध्येही आज रात्री 8 वाजल्यापासून विकेंड लॉकडाऊनला सुरुवात होत आहे. (What starts on Saturday and Sunday in Panvel, what will be closed?)

पनवेलमध्ये विकेंड लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहेस. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. त्याबाबत पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नियमावली जारी केली आहे.

विकेंड लॉकडाऊन : पनवेलमध्ये काय सुरु राहणार?

1. फक्त वैध कारण असणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी.

2. वैद्यकीय, अत्यावश्यक सेवा आणि त्याच्याशी निगडीत लोकांना विकेंड लॉकडाऊनमधून सूट.

3. विकेंड लॉकडाऊनमध्ये रुग्णालय, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक, मेडिकल, मेडिकल इन्शुरन्स ऑफिस, फार्मा कंपन्या, मेडिकल आणि हेल्थ सर्विस चालू असणार.

4. किराणा, भाजीपाल्याची दुकान, डेअरी, बेकरी, मिठाई खाद्यपदार्थांची दुकानेही सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील.

5. विकेंड लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतुकीतील ट्रेन, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसेस सुरु राहतील.

6. माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना विकेंड लॉकडाऊनमध्ये परवानगी.

7. शेतीशी निगडीत सेवा सुरु राहतील.

8. ई-कॉमर्स सेवा सुरु राहतील.

9. मीडियाला परवानगी असेल.

10. सकाळी 7 ते रात्री 8 वाजतेपर्यंत वृत्तपत्रांच्या होम डिलिव्हरीला परवानगी.

11. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या सेवा सुरु राहतील.

12. बांधकाम सुरु राहतील

13. कारखाने सुरु राहतील

विकेंड लॉकडाऊन : पनवेलमध्ये काय बंद राहणार?

1. खासगी वाहने किंवा खासगी बसेस बंद राहतील.

2. विकेंड लॉकडाऊनमध्ये हॉटेलमधील पार्सल सेवाही बंद असेल. यावेळी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी सुरु असणार आहे. यावेळी कोणत्याही रेस्टॉरंट, बारला आपल्याला आपली ऑर्डर घेण्यासाठी जाता येणार नाही.

3. वॉटर पार्क, क्लब, स्विमिंग पूल, जिम, स्पोर्ट्स कॉम्पलेक्स बंद राहतील.

4. विकेंड लॉकडाऊनमध्ये हॉटेलमधील पार्सल सेवा देखील बंद असेल. यावेळी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी सुरु असणार आहे. यावेळी कोणत्याही रेस्टॉरंट, बारला नागरिकांना ऑर्डर घेण्यासाठी जाता येणार नाही.

5. वीकेण्ड लॉकडाऊन च्या दरम्यान फळ विक्रेत्यांसह रस्त्यांच्या कडेला खाद्यपदार्थांची विक्री सुरू ठेवता येतील, परंतू केवळ पार्सल सेवा देता येईल. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलजवळ उभे राहून खाता येणार नाही.

6. शुक्रवारी रात्री 8.00 ते सोमवार सकाळी 7.00 वाजेपर्यंत सर्व समुद्र किनारे, उद्याने, सार्वजनिक मैदाने बंद राहतील.

संबंधित बातम्या :

Pune Weekend lockdown guidelines : पुण्यात वीकेंड लॉकडाऊनचे नियम, मेडिकल-दूध वगळता सर्व बंद

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्र्यांनी बाह्या सरसावल्या, फडणवीस, राज ठाकरेंसह सर्वपक्षीयांना पुन्हा बोलावलं, कडक लॉकडाऊनची शक्यता

What starts on Saturday and Sunday in Panvel, what will be closed?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI