पनवेलच्या भूमी लँडमार्क इमारतीला आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

पनवेलच्या भूमी लँडमार्क इमारतीला आग लागलेली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत.  अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

पनवेलच्या भूमी लँडमार्क इमारतीला आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 1:11 PM

पनवेल (नवी मुंबई) :  पनवेलच्या भूमी लँडमार्क इमारतीला आग लागलेली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत.  अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

खांदा कॉलनी येथे भूमी लँडमार्क इमारत आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागलेली आहे. भूमी लँडमार्क इमारतीत अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. त्यामुळे आगीने रौद्र रुप धारण करण्याअगोदर या इमारतीची आग विझली जावी, अशा प्रयत्नात अग्रीशन दलाचे जवान आहेत.

आग लागलेल्या इमारतीपासून जवळ अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. त्यामुळे आगीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आजूबाजूचे ऑफिसेस सतर्क झाले आहेत. तसंच अग्रिशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग विझवण्याचं काम सुरु आहे.