Navi Mumbai: विक्स लावून तिघा मुलींवर अत्याचार! नवी मुंबईच्या सीवूड्समधील आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार, एकीचा गर्भपात

Navi Mumbai Crime News : याप्रकरणी ठाणे जिल्हा महिला-बाल विकास विभागाने एन आर आय पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Navi Mumbai: विक्स लावून तिघा मुलींवर अत्याचार! नवी मुंबईच्या सीवूड्समधील आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार, एकीचा गर्भपात
नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 13, 2022 | 8:06 AM

नवी मुंबई : नवी मुंबईच्या सीवूड्स सेक्टर-48 मधील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमध्ये बेकायदेशीररीत्या चालविण्यात येत असलेल्या आश्रमशाळेवर ठाणे जिल्हा महिला बाल विकास विभागाने शुक्रवारी कारवाई केली आहे. त्याठिकाणी ठेवण्यात आलेल्या 3 ते 18 वयोगटातील 45 मुलांची सुटका केली. 45 पैकी 13 मुली होत्या. यातील 3 मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याचे मुलींनी सांगितल्याने धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी बेलापूर येथील एन आर आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसानी एकाला ताब्यात घेतले आहे. यातील एका मुलीच्या गर्भपात केल्याची माहिती समोर येत असून , मुलींच्या पालकांना भेटू न देण्याचे प्रकार समोर आले आहे. याप्रकरणी ठाणे जिल्हा महिला-बाल विकास विभागाने एन आर आय पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार मुलींचा जबाब नोंदविण्यात आला असून विनयभंग आणि पॉस्कोचा गुन्हा दाखल करून चर्च मधील केअरटेकरला ताब्यात घेण्यात आलंय. सध्या त्याची चौकशी केली जातेय.

ज्यावेळी छापा टाकला, त्यावेळी आश्रम शाळेत सर्व गोष्टी अस्ताव्यस्त होत्या. तसंच अस्वच्छताही होती, अशी माहिती समोर आली आहे. फास्टरकडून मुलींवर क्रूर पद्धतीने लैंगिक अत्याचार केले जात होते, अशी माहिती प्राथमिक माहिती समोर आलेली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. चाईल्ड लाईनमार्फत महिला आणि बाल कल्याण विभागाला याबाबातची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे आश्रम शाळेवर छापा टाकण्यात आला. 5 ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली. महिला व बालविकास अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितानुसार, एकूण 45 मुलं रेस्क्यू करण्यात आलीत. सरकारी बालगृहात या मुलांना दाखल करण्यात आलं. रेस्क्यू केलेल्या मुलांमध्ये 13 मुली अल्पवयीन आहेत. त्यातील तीन मुलींनी स्पष्टपणे लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली असल्याचही धक्कादायक वास्तव समोर आलंय.

विक्स लावून, तेल लावून घाणेरडी क्रूर कृत्य आश्रम शाळेतील फास्टर करत होता. गुंगीचं औषध देण्याचं कामही केलं होतं, अशीही माहिती मुलींच्या चौकशीतून समोर आली आहे. काही गतीमंद मुलीही आश्रम शाळेत होत्या अशीही माहिती समोर आली असून तीन मुलींनी या लैंगिक अत्याचारप्रकरणी जबाब दिले आहेत. पालकांनाही आश्रमशाळेतून इशारा देण्यात आला होता. दोन महिन्यातून एकदा या मुलींना आश्रमशाळेतील पालकांना भेटू दिलं जातं होतं. तामिळनाडू, गुजरात, राजस्थानमधून आलेल्या मुली आश्रमशाळेत राहत होत्या. सध्या याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती शुक्रवारी महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे रेस्क्यू केलेल्यांपैकी एका मुलीचा गर्भपातही करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने सगळेच हादरुन गेलेत.