दिलासादायकः बृहन्मुंबई महानगरपालिका‌ क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद नाही; 2 जानेवारीनंतर आज पहिल्यांदाच संख्या शून्यावर

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविडचा पहिला रुग्ण हा मार्च 2020 मध्ये आढळून आला होता. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2021 मध्ये एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. या नंतर 'डिसेंबर 2021' मध्ये देखील 7 वेळा 'शून्य' मृत्यूंची नोंद झाली होती.

दिलासादायकः बृहन्मुंबई महानगरपालिका‌ क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद नाही; 2 जानेवारीनंतर आज पहिल्यांदाच संख्या शून्यावर
पावसाळा पूर्वतयारी बाबत मुंबई महापालिकेत विशेष बैठक संपन्न
| Edited By: | Updated on: Feb 15, 2022 | 10:14 PM

मुंबईः बृहन्मुंबई महानगरपालिकेने आता ‘कोविडचा (Covid) मुकाबला करण्यासाठी अवलंबिलेल्या वेगवेगळ्या कार्यवाही ही योग्य दिशेनेच वाटचाल करत असल्याचे आज पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कारण 2 जानेवारी आज पहिल्यांदाच कोविड बाधितांची संख्या शून्यावर आली आहे. महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. तर त्याचबरोबर ‘कंटेनमेंट झोन’ (Containment zone) व ‘सिल्ड’ इमारतींची संख्यादेखील ‘शून्य’ इतकीच नोंद करण्यात आली आहे‌. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार कोविडचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आला असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविडचा पहिला रुग्ण हा मार्च 2020 मध्ये आढळून आला होता. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2021 मध्ये एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. या नंतर ‘डिसेंबर 2021’ मध्ये देखील 7 वेळा ‘शून्य’ मृत्यूंची नोंद झाली होती. तर यापूर्वी एकाही मृत्यू झाली नसल्याची नोंद 2 जानेवारी 2022 रोजी झाली होती. त्यानंतर आज पहिल्यांदाच पुन्हा एकदा शून्य अशी नोंद महानगरपालिका क्षेत्रात झाली आहे. कोविडचे रुग्ण सापडल्यानंतर महापालिकेने सगळ्या उपाय योजना करुन कोरोनाचा फैलाव कमी करण्यात आला होता.

महानगरपालिकेने कंटेनमेंट झोन, सिल्ड इमारती याबाबत प्रभावी अंमलबजावणी करुन लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी ठिकठिकाणी सुरू करण्यात आलेली ‘कोविड’ चाचणी केंद्रे, कोविड बाधित रुग्णांना वेळेवर दिलेला औषध उपचार मिळावे यासाठी केलेले प्रयत्न कोरोना रोखण्यासाठी उपयुक्त ठरले आहेत. विकेंद्रित नियंत्रण कक्षांची कार्यपद्धती, जंबो कोविड रुग्णालये, लसीकरण, प्रभावी अंमलबजावणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना, सातत्याने केलेली जनजागृती आणि मुंबईकरांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळेच ‘शून्य कोविड मृत्यू’ असल्याची नोंद झाली आहे.

संबंधित बातम्या

‘हिंदूहृदयसम्राट नाही, मराठी हृदयसम्राट म्हणा’, घाटकोपरमधील बॅनर आणि घोषणाबाजीनंतर राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

‘राऊतांनी मोठा गौप्यस्फोट करण्याचं सांगून पुरती निराशा केली, 420 चा गुन्हा दाखल करा’, मनसेचा जोरदार टोला

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी केंद्रांची संख्या वाढवली; वर्षा गायकवाड यांनी सांगिलला परीक्षेचा संपूर्ण प्लॅन