AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राऊतांनी मोठा गौप्यस्फोट करण्याचं सांगून पुरती निराशा केली, 420 चा गुन्हा दाखल करा’, मनसेचा जोरदार टोला

संजय राऊतांच्या या आरोपांनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार टोला लगावला आहे. राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा केला होता. पण त्यांनी सर्वांची निराशा केली, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, असा खोचक टोला देशपांडे यांनी लगावला आहे.

'राऊतांनी मोठा गौप्यस्फोट करण्याचं सांगून पुरती निराशा केली, 420 चा गुन्हा दाखल करा', मनसेचा जोरदार टोला
संजय राऊत, संदीप देशपांडे
| Edited By: | Updated on: Feb 15, 2022 | 9:06 PM
Share

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya), माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजयुमोचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर आरोप केले. किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्याच्या निकॉन प्रकल्पात पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसै वापरला गेल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नात वापरण्यात आलेल्या कार्पेटची किंमत साडे नऊ कोटी रुपये असल्याचा दावाही राऊत यांनी केलाय. तसंच मोहित कंबोज यांच्या प्रकल्पांमध्येही पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. राऊतांच्या या आरोपांनंतर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी जोरदार टोला लगावला आहे. राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा केला होता. पण त्यांनी सर्वांची निराशा केली, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, असा खोचक टोला देशपांडे यांनी लगावला आहे.

संदीप देशपांडे म्हणाले की, संजय राऊत हे भाजपमधील साडे तीन लोकांची नावं सांगणार होते. पण त्यातील स देखील बाहेर आला नाही. राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला होता. पण त्यांनी सर्वांची पुरती निराशा केली आहे. त्यामुळे राऊत यांच्यावर फसवणुकीचा, 420 चा गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर शिवजयंतीला बंधनं घालणाऱ्यांनी याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे की आज ज्या पद्धतीची गर्दी जमली होती, त्यामुळे कोरोना पसरणार नाही का? कोरोना पसरवायला ही गर्दी नव्हती का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं. आजची पत्रकार परिषद शिवसेनेचे नव्हती तर संजय राऊत यांची वैयक्तिक होती. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे महत्वाचे मंत्री नव्हते. तसंच आजची पत्रकार परिषद नाही तर केवळ भाषण होतं, अशी टीकाही देशपांडे यांनी केलीय. इतकंच नाही तर नेत्यांनी नातेवाईकांच्या नावे संपत्ती करु नये, जेणेकरुन अशा पद्धतीची कारवाई होणार नाही, असा खोचक सल्लाही त्यांनी दिलाय.

राऊतांचा नील सोमय्या आणि किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप

ईडी वाले सुनो.. सीबीआयवाले सुनो.. सगळ्यांनी ऐका जरा माझं. हा जो किरीट सोमय्या आहे तो एक फ्रॉड आहे. त्यांनं बँक घोटाळा केलाय. लोकांचे पैसे बुडवलेत. तर मी विचारचो की निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची, नील सोमय्याची आणि हा राकेश वाधवानचा पार्टनर आहे. मौजे गोखिवरे वसईत यानं तिथं एक प्रोजेक्ट केलाय. वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं आणि त्याला लुबाडलं आणि आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले. कॅशही घेतली. तब्बल 100 कोटी घेतले. लडानीच्या नावावर त्यांनी जमीन घेतली. 400 कोटी रुपयांची जमीन फक्त 4.4 कोटी रुपयांनी खरेदी केली. त्यांनी अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या.. या कंपनीचा डायरेक्ट आहे नील किरीट सौमय्या आहे, असा थेट आरोप राऊत यांनी केलाय.

सोमय्या बुधवारी पत्रकार परिषद घेणार

दरम्यान, संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी किरीट सोमय्या उद्या सकाळी साडे नऊ वाजता पत्रकार घेणार आहेत. तत्पूर्वी, सोमय्या यांनी आज ट्वीट करुन राऊतांना उत्तर दिलं आहे. 2017 मध्ये संजय राऊत संपादक असलेल्या सामना ने माझ्या पत्नीच्या नावाने असेच आरोप केले होते. आज त्याच बांधकाम व्यावसायिकाचे नाव घेऊन माझ्या मुलावर आरोप केले जात आहेत. या आरोपाबाबत ठाकरे सरकारने माझी जरूर चौकशी करावी , असे आव्हान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिले आहे.

इतर बातम्या :

‘राऊत साहेब तुम्ही उद्धव ठाकरेंचे ब्लू आईड बॉय आहात की शरद पवारांचे?’, मोहित कंबोज यांचा खोचक सवाल; आरोपांनाही जोरदार प्रत्युत्तर

Video : शिवसेना भवनसमोरचा एक व्हिडीओ जो भाजपच्या नेत्यांनीही का पाहावा? मराठी-गुजराती ध्रुवीकरण?

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.