Video : शिवसेना भवनसमोरचा एक व्हिडीओ जो भाजपच्या नेत्यांनीही का पाहावा? मराठी-गुजराती ध्रुवीकरण?

राऊतांच्या या पत्रकार परिषदेला संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते जमले होते. मात्र या गर्दीत एका 90 वर्षांच्या आजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. चंद्रभागा शिंदे नावाच्या या आजीने तुफान गर्दीतून वाट काढत संजय राऊतांची भेट घेतली.

Video : शिवसेना भवनसमोरचा एक व्हिडीओ जो भाजपच्या नेत्यांनीही का पाहावा? मराठी-गुजराती  ध्रुवीकरण?
निष्ठा काय असते? या आजीकडून शिका
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 7:45 PM

मुंबई : आज शिवसेना खासदार संजय राऊतांनी दादरमधील शिवसेना भवनात वादळी पत्रकार परिषद (Sanjay Raut Press Conference) घेतली. त्यात त्यांनी भाजप (Bjp) नेत्यांवर आरोपांची चौफेर बॅटिंग केली. राऊतांच्या या पत्रकार परिषदेला संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते जमले होते. मात्र या गर्दीत एका 90 वर्षांच्या आजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. चंद्रभागा शिंदे नावाच्या या आजीने तुफान गर्दीतून वाट काढत संजय राऊतांची भेट घेतली. पोलिसांनी यावेळी लाख अडवण्याचा प्रयत्न केला पण या आजीने कोणाचेही ऐकले नाही. तिने हार न मानता तेवढ्या गर्दीतूनही वाट काढलीच शेवटी. म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक नेत्याने पाहवा असा आहे. यावेळी संजय राऊतांशी हात मिळवत या आजीने बाळासाहेबांसाठी रक्ताचे पाणी करू अशी हाक दिली. बाळासाहेबांसाठी आम्ही मरण पत्करू पण मागे हटणार नाही. दोन वर्षे उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) लढा देत आहेत, मात्र भाजपवाले चुगल्या लावत आहे. असा घणाघातही या आजींनी यावेळी केला.

राऊतांच्या भेटीनंतर आजी काय म्हणाल्या?

या भाजपवाल्यांना आम्ही सोडणार नाही. एवढ्या महिला एकवटल्या आहे, आम्ही पाहतो भाजपवाले काय करताहेत, असा सज्जड दमही त्यांनी भाजपला भरला. जेव्हापासून वानराव महाडिक लढत होते, बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हापसून मी शिवसेनेची कार्यकर्ती आहे. त्यामुळे मला जीवाची पर्वा नाही. असं या आजींनी ठणकावून सांगितलं. शिवडीतून आलेल्या या आजींनी आम्ही मारामारी करायलाही घाबरणार नाही असं ठासून सांगितलं. आमच्या साहेबांच्या जीवावर उठलेल्यांची आम्ही वरात काढू, अशा शब्दात खडे बोल त्यांनी सुनावले आहेत. संजय राऊत हे आमचे पहिल्यापासून शिवसैनिक आहेत. आम्ही संजय राऊतांना मानत असल्याने मी संजय राऊतांशी हात मिळवायला गेले. संजय राऊत भाजपला टक्कर देतात. त्यामुळे मला त्यांना भेटावसं वाटलं. म्हणूनच मी संजय राऊतांना भेटले, असेही त्यांनी ठासून सांगितले.

गर्दीतल्या निष्ठावंत कार्यकर्त्याचे दर्शन

आजच्या राजकारणात कार्यकर्ते रोज स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारताना दिसून येतात. मात्र असे निष्ठावंत कार्यकर्ते क्वचितच दिसून येतात. आज पत्रकार परिषद जरी संजय राऊतांची असली तरी या आजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एखाद्या तरण्याबांड पोरालाही ज्या गर्दीतून वाट निघणार नाही, अशा गर्दीतून त्यांनी वाट काढली. त्यामुळे सोशल मीडियावरही या आजी चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. राजकारणातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक नेत्याने पाहवा असा सुंदर हा व्हिडिओ आहे.

संजय राऊतांचा स्मगलरशी संबंध काय?, मोहित कंबोज यांचे राऊतांना चार सवाल

‘राऊत साहेब तुम्ही उद्धव ठाकरेंचे ब्लू आईड बॉय आहात की शरद पवारांचे?’, मोहित कंबोज यांचा खोचक सवाल; आरोपांनाही जोरदार प्रत्युत्तर

राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर सोमय्यांचं पहिलं ट्विट, ठाकरेंना उद्देशून म्हणाले…

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.