AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हिंदूहृदयसम्राट नाही, मराठी हृदयसम्राट म्हणा’, घाटकोपरमधील बॅनर आणि घोषणाबाजीनंतर राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

राज ठाकरे यांच्या हस्ते काल घाटकोपरमधील मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी मनसेकडून मोठी बॅनरबाजी करण्यात आली होती. त्या बॅनरवर राज ठाकरे यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट असं लिहिण्यात आलं होतं.

'हिंदूहृदयसम्राट नाही, मराठी हृदयसम्राट म्हणा', घाटकोपरमधील बॅनर आणि घोषणाबाजीनंतर राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
| Edited By: | Updated on: Feb 15, 2022 | 10:12 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणात आजपर्यंत शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना हिंदूहृदयसम्राट ही उपाधी दिली गेली. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाही हिंदूहृदयसम्राट असं संबोधण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते काल घाटकोपरमधील मनसेच्या कार्यालयाचं (MNS Office) उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी मनसेकडून मोठी बॅनरबाजी करण्यात आली होती. त्या बॅनरवर राज ठाकरे यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट असं लिहिण्यात आलं होतं. त्यानंत आता राज ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट नाही तर मराठी हृदयसम्राट म्हणा, असे आदेश मनसैनिकांना देण्यात आले आहेत.

गेल्या अनेक दशकांपासून देशात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढेच हिंदूहृदयसम्राट अशी उपाधी लावली जात होती. भाजपच्याही कुठल्या नेत्याच्या नावापुढे आजवर हिंदूहृदयसम्राट लावण्यात आलं नाही. मात्र, मनसेनं हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर आता त्यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट लावण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगतेय. महत्वाची बाब म्हणजे मागे एकदा अशाच प्रकारचे बॅनर मनसे कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते. त्यावेळी मला हिंदूहृदयसम्राट म्हणून नका असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. मात्र, यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राज यांना केवळ बॅनरवरच हिंदूहृदयसम्राट असं संबोधलं नाही तर राज ठाकरे यांच्यासमोरच हिंदुहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे… अशी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली होती.

राज ठाकरेंचं हिंदुत्व शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार?

राज्यात शिवसेनेनं भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केलाय. मागील दोन वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. अशावेळी शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याचा आणि बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसल्याचा आरोप भाजप नेत्यांसह विरोधकांकडून केला जातो. अशातच आता मुंबईसह राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्याचबरोबर अधेमधे भाजप आणि मनसे युतीची चर्चाही सुरु असते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट संबोधून मनसे राजकारणात जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील कंबर कसुन मैदानात उतरले आहेत. मुंबई, पुण, नाशिक आणि औंरगाबाद शहराचा सातत्याने दौरा करुन त्यांनी आपले मनसुबेही सातत्याने स्पष्ट केले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या नावापुढे मनसे कार्यकर्ते लावत असलेली हिंदूहृदयसम्राट ही उपाधी शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

इतर बातम्या :

‘राऊतांनी मोठा गौप्यस्फोट करण्याचं सांगून पुरती निराशा केली, 420 चा गुन्हा दाखल करा’, मनसेचा जोरदार टोला

‘राऊत साहेब तुम्ही उद्धव ठाकरेंचे ब्लू आईड बॉय आहात की शरद पवारांचे?’, मोहित कंबोज यांचा खोचक सवाल; आरोपांनाही जोरदार प्रत्युत्तर

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.