नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची साफसफाई; 37 वरिष्ठ पोलीस निरीक्षक-निरीक्षकांच्या बदल्या

| Updated on: Aug 21, 2021 | 1:17 PM

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीसनिरीक्षक दर्जाच्या 37 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त विपीनकुमार यांना आस्थापन मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार गुरुवारी रात्री बदल्यांचे आदेश काढले गेले. यामध्ये क्राईम ब्रँच, वाहतूक, नियंत्रण कक्ष, पोलीस ठाणे, बीडीडीएस, अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची साफसफाई; 37 वरिष्ठ पोलीस निरीक्षक-निरीक्षकांच्या बदल्या
Navi Mumbai Police
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीसनिरीक्षक दर्जाच्या 37 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त विपीनकुमार यांना आस्थापन मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार गुरुवारी रात्री बदल्यांचे आदेश काढले गेले. यामध्ये क्राईम ब्रँच, वाहतूक, नियंत्रण कक्ष, पोलीस ठाणे, बीडीडीएस, अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

वाहतूक विभागातून बदली केलेल्या अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्ष, बीडीडीएस, अतिक्रमण विभागात तर काही अधिकाऱ्यांच्या पोलीस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये क्राईम ब्रँचचे विजय काबदाने यांची पनवेल शहरला बदली करण्यात आली आहे.

मोरा सागरीचे पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांची खारघर पोलीस ठाणे तर शत्रुघ्न माळी नियंत्रण कक्ष ते क्राईम बॅच युनिट तीन, नितीन गिते रबाळे एमआयडीसी ते तुर्भे वाहतुक, अभिजीत मोहिते वाहतुक पनवेल ते मोरा सागरी, संजय चव्हाण सीबीडी ते नेरूळ पोलीस ठाणे, महेंद्र मोरे यांना मनपा अतिक्रमण मुदतवाढ, अनंत चव्हाण सिडको अतिक्रमण, भानदास खटावकर वेल्फेर, माणिक नलावडे यांना विशेष शाखा, भरत कामत बीडीडीएस, दत्तात्रय किंद्रे म्हापे सानपाडा पोलीस ठाणे, बाबुराव देशमुख वाशी वाहतुक, भागोजी ओटी रबले पोलीस ठाणे, संजय नाळे पनवेल वाहतूक, उमेश गवळी सीबीडी पोलीस ठाणे, अशोक गायकवाड गव्हाण वाहतूक, गोपाल कोळी रवाले वाहतूक, सुधीर पाटील रबाले एमआयडीसी प्रभारी, जगदीश कुलकर्णी उरण वाहतूक तर मध्यवर्ती शाखा पीआय कोल्हटकर गुन्हे प्रशासन अशा बदल्या करण्यात आल्या.

संबंधित बातम्या :

सहा वर्षांपासून बदलीच नाही, माहूरच्या तहसीलदारांना राजाश्रय कुणाचा?, तलाठी संघटनांनंतर आता पुढारीही एकवटले!

मॅटचा आदेश, पण बदली होत नाही, पोलीस निरीक्षकाची महासंचालक संजय पांडे यांना नोटीस, नेमकं प्रकरण काय?